Issue Of Compensation : बुलढाण्यात गारपीट, अतिवृष्टी व अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. मात्र तलाठी व ग्रामसेवकांनी सर्वेक्षण केल्यानंतर नुकसानीचा पंचनामा निरंक दाखविला. त्यामुळे भरपाईपासून वंचित असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील काथरगाव पिंप्री व काथरगाव येथील शेतकरी संतापले आहेत. शेतकऱ्यांनी जमिनीत गाडून घेत आंदोलन केले. या आंदोलनात महिलादेखील सहभागी झाल्या. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अद्याप शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळाली नसल्याने महिलांसह सरपंचाने आंदोलनाचा पवित्रा घेतला.
सरपंच सुवर्णा टापरे, युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव गणेश टापरे, उपसरपंच लिला मुंडे, सुमेध हातेकर, प्रिया गोल्हर, विलास कंकाळ, संजय मुंडे, सुधाकर डाखोरे, निळकंठ माळोकार, संदीप यांनी स्वतःला छातीपर्यंत जमिनीत गाडून घेतले. प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. महसूल विभागाच्या वरिष्ठांनी आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी आंदोलन मागे घेण्यात आले. सकाळी आठ वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते.
प्रशासनाबद्दल राग
26 व 27 फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणात गारपीट व अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठही तहसीलदार यांना निवेदन दिले. त्यानंतरही नुकसान भरपाई मिळली नाही. त्यामुळे दहा ते बारा शेतकऱ्यांनी महिला सरपंचासह भूमिगत आंदोलनाची सुरुवात केली. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी भूमिगत झालेल्या सरपंच सुवर्णा गणेश टापरे यांना तत्काळ पत्र देऊन त्यांचे भूमिगत आंदोलन स्थगित करून घेतले.
आंदोलनावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले, जळगाव जामोद मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉ. स्वाती वाकेकर उपस्थित होत्या. महाराष्ट्र प्रदेश सचिव राजेश्वर देशमुख, तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे यांनीही शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला. रयत क्रांतीचे नाना पाटील यांनी गावाला भेट दिली.
सरपंच प्रतिभा इंगळे, राजू राठोड, धर्मेंद्र इंगळे, गिरीष घाटे, संतोष उमरकर, पंकज तायडे, कैलास ठाकरे, श्रीकृष्ण बावस्कार आदी आंदोलनात होते. गजानन तायडे, दिनेश उकर्डे, कैलास उकर्डे, शिवशंकर बावस्कार, राष्ट्रपाल हातेकर, आकाश हातेकर, मुन्ना पाटील, दिलीप डाखोडे, शेख शहीद, सुपेश बावस्कर, विजय गोल्हर, परमेश्वर मुंडे, संजय नांदोकार यांच्यासह गावकरी यावेळी उपस्थित होते.