महाराष्ट्र

Ravikant Tupkar : शेतकरी नेते तुपकर पोहोचले मंत्रालयात !

Farmers : पिकविमा जमा करण्याची मागणी

Buldhana News : लोकसभा निवडणुकीत परावभ झाल्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि त्यांच्या पत्नी थांबलेले नाहीत. त्यांनी पुन्हा शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यसाठी नव्या दमानं मैदानात उतरल्याचे पाहावयास मिळत आहे. रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामातील पिक विमा मंजूर असलेल्या ८५ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा जमा करावा, यासाठी थेट मंत्रालय गाठले.

अ‍ॅड. शर्वरीताई तुपकरांनी नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या शेतकरयांच्या बांधांपर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना धीर दिला. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामातील पिकविमा मंजूर असलेल्या ८५ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही पिकविमा जमा झालेला नाही. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पिकविमा जमा करण्याबाबत पिकविमा कंपन्यांना आदेश द्यावे,अशी मागणी रविकांत तुपकर यांनी राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

१२ जून रोजी मुंबई येथे मंत्रालयात तुपकरांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली. नवीन खरीप हंगाम आला तरी मागील खरीप हंगामाचा पिकविमा शेतकऱ्यांना मिळाला नाही, ही मोठी शोकांतिका असल्याचेही तुपकरांनी त्यांना सांगितले. राज्यात पावसाचे आगमन झाले आहे. पेरणीची लगबग सुरू झाली आहे. परंतु असे असले तरी गतवर्षीच्या पात्र शेतकऱ्यांना अद्यापही पिकविम्याची रक्कम मिळालेली नाही. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामातील पिकविमा मंजूर असलेल्या ८५ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना पिकविम्याची प्रतीक्षा आहे.

सध्या राज्यभरातील शेतकरी खते आणि बी-बियाण्यांच्या खरेदीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी करत आहेत. या पार्श्वभूमीवर खते, बी- बियाण्यांचा राज्यामध्ये होणारा तुटवडा, बोगस खतांची विक्री व लिंकिंगच्या माध्यमातून अतिरिक्त खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रकार तातडीने थांबविण्यासंदर्भात कृषी विभागाला सूचना देण्याचीसुद्धा मागणी तुपकरांनी केली आहे. त्याचबरोबर गेल्यावर्षी सिंदखेडराजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

शेडनेट उत्पादक शेतकर्‍यांच्या सात बारावर बोजा चढवण्याचा घाट कृषी विभागाने घातला आहे. हा घाट तातडीने थांबवण्यासंदर्भात तुपकरांना मुंडे यांना सांगितले. त्यावर ना.धनंजय मुंडे यांनी तातडीने बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांना शेतकऱ्यांवर होणारी कारवाई थांबवण्याचे आदेश दिले आहे. याप्रसंगी इसरूळचे सरपंच सतीश पाटील-भुतेकर, श्याम पाटील-भुतेकर, भिकणराव भुतेकर व प्रदीप सोळंकी उपस्थित होते.

Ramtek Constituency : ही जागा नेहमीसाठी दिली आहे, असे समजू नका !

अ‍ॅड. तुपकरांकडून सांत्वन..

चक्रीवादळाने सिंदखेडराजा व चिखली तालुक्यात अक्षरश: थैमान घातले आहे. यात अनेकांच्या घरांची पडझड झाली, टिनपत्रे उडाले, अनेकांनी पेरणीसाठी आणून ठेवलेली खते, बियाणे ओली झाली आहेत. दरम्यान, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी अ‍ॅड. शर्वरी तुपकर यांनी १२ जूनरोजी सिंदखेडराजा आणि चिखली तालुक्यातील चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागात भेट दिली. देऊळगावघुबे येथे चक्रीवादळाने झोक्यात झोपलेली चिमुकली टिनपत्रांसह उडून गेली होती. तिचा जमिनीवर आदळून मृत्यू झाला होता. त्या साखरे कुटुंबीयांचीही अ‍ॅड. तुपकरांनी भेट घेतली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!