Shiv Sena : 2019 च्या निवडणुकीपासून महाराष्ट्रातील राजकारणाचे चित्रच बदलले. एकेकाळी मित्र म्हणून सत्तेत सोबत असलेले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकमेकांचे कट्टर विरोधक झाले. राज्यातील सरकारच्या कार्यकाळातील विधिमंडळाचे शेवटचे अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनात हे दोन्ही विरोधक पुन्हा एकत्र आल्याने चर्चेला कारण मिळाले आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच लिफ्ट मधून सभागृहात जात असताना या लिफ्टमध्ये प्रवीण दरेकर जाऊ पाहत होते. त्यांच्यावर उद्धव ठाकरे खडसावले आणि दरेकरांना बाहेरचा रस्ता दाखवल्याची देखील माहिती आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची अचानक भेट झाली. विधिमंडळात जात असताना या दोघांनी एकाच लिफ्ट मधून प्रवास केला आहे. प्रविण दरेकर देखील यावेळी लिफ्टमध्ये जाणार इतक्यात उद्धव ठाकरे यांनी आधी दरेकरांना बाहेर काढा, असे विधान केले. आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले तर चर्चा तर होणारच.
आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर सभागृहात जाण्यासाठी विधिमंडळातील लिफ्ट जवळ उभे होते. याचवेळी त्या लिफ्ट जवळ माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर पोहोचले.
मग हे सगळे नेते एकत्र लिफ्टने सभागृहात जाण्यासाठी निघाले. उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीस हे लिफ्टमध्ये गेले. इतक्यात भाजपचे नेते प्रविण दरेकर हे त्या लिफ्टमध्ये जाऊ लागले. मात्र इतक्यात ‘याला आधी बाहेर काढा’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘लिफ्ट’ भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
विधानभवन परिसरात आज महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठी दृश्य पहायला मिळाली. भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलाचे तर हे संकेत नाही?, ना अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीला काही वेगळे चित्र पहायला मिळणार का? हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरेल. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आधी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन, घोषणाबाजी केली. त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे विधान भवन परिसरात दाखल झाले. त्यानंतर विधान भवनात जे चित्र दिसले, त्याची चर्चा आहे.
चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिले चॉकलेट!
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. अधिवेशनाला नेहमी शेवटच्या दिवशी हजर राहणारे उद्धव ठाकरे आज पहिल्याच दिवशी हजर राहिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे, भाजप नेते आणि राज्याच उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंची भेट घेत स्वागत केले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांची भेट घेतली. यावेळी विधानपरिषदेचे उमेदवार अनिल परबही उपस्थित होते. या भेटीत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांना चॉकलेट दिले. तसेच तुम्हाला निकालाच्या आधीच शुभेच्छा देतो, असे म्हणत अनिल परब यांना पेढाही भरवला.