महाराष्ट्र

Maharashtra Government : खूप ऐकले राजकीय पक्षांचे इशारे, आता सरकारलाच दिला इशारा !

Buldhana : खरातांना पाहून शेतकर्‍यांच्या आश्रुंचा बांध फुटला

Shiv Sena : मुंबईतील निवृत्त सरकारी अधिकाऱ्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. स्वेच्छानिवृत्त मंत्रालयीन सहसचिव सनदी अधिकारी सिद्धार्थ खरात यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात खरात उतरणार आहेत. आतापर्यंत राजकीय पक्षांचे, विविध आंदोलनाचे इशारे ऐकणारे खरात आता स्वतः सरकारला इशारा देताना पाहावयास मिळत आहे. 

राजकारणाचा मार्ग

उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्री निवासस्थानी खरातांनी शिवबंधन बांधले. सरकारी नोकरी सोडून खरात यांनी राजकारणात येण्याचा मार्ग स्वीकारला. थेट मेहकर विधानसभा मतदारसंघात खरातांनी उडी घेतली आहे. मेहकर-लोणार मतदारसंघासह जिल्हात अतिवृष्टी पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतात खरीप पिकांची नासाडी होत आहे. काही भागात पिकांचा चिखल झाला आहे.

शेतकरी नैसर्गिक संकटांत हतबल होऊन कर्जबाजारी होत आहे. शेतकरी देशोधडीला लागला असताना नुसते पंचनामे काय करता? आता आश्वासन नको; शेतकर्‍यांना आधी सरसकट मदत करा. शेतकरी पण लाडका आहे, हे दाखवून द्या, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे सदस्य तथा माजी सनदी अधिकारी व मेहकर विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात इच्छुक असलेले उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी राज्य सरकारला फटकारले.

पिकाची पाहणी

मेहकर तालुक्यातील पारखेड येथे शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पिकांची पाहणी केली. अक्षरशः विजयसिंह राठोड व मैनाबाई राठोड या बंजारा शेतकर्‍यांच्या अश्रूचा बांध फुटला होता. त्यावेळी सिद्धार्थ खरात यांनी त्याच्यांशी संवाद साधून धीर सोडू नका, उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक तुमच्या सोबत आहे. लवकरच तुम्हाला आर्थिक मदत कशी होईल, यासाठी तहसीलदारांकडे मागणी करतो, असे म्हणत दिलासा दिला.

Bhagyashri Atram : ‘गोंडवाना’च्या सिनेट सदस्य हातात घेणार तुतारी !

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धार्थ खरात म्हणाले की, राज्य सरकार नेहमीच शेतकर्‍यांना आश्वासनाची खैरात वाटते. पण प्रत्यक्ष मदत करत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळेच राज्य सरकार शेतकर्‍यांच्या बाबतीत उदासीन वाटते. आज राज्याच्या बहुतांश भागात आभाळ फाटलेले आहे. शेतकर्‍यांची उभी पिके उद्ध्वस्त होत आहेत. मेहकर-लोणार मतदारसंघात पावसाचा जबर तडाखा बसला आहे.

 

काही भागांत सोयाबीन, मूग, उडीद, मका, तूर या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकरी बांधवांचा धीर सुटत चालला आहे. आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आश्वासन देण्यापेक्षा, शेतकर्‍यांना सरसकट आर्थिक मदत देण्यासाठी तातडीने पावले उचलावी. सरकारने निवडणुकीच्या तोंडावर तरी सकारात्मकता दाखवावी, असे सिद्धार्थ खरात म्हणाले.

मेहकरमधून विधानसभेसाठी उत्सुक..

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यास सिद्धार्थ खरात हे इच्छुक असल्याची माहिती आहे. त्यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, ग्राम विकास विभाग, गृह विभागामध्ये सहसचिव म्हणून काम केले आहे. राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!