Mahayuti विधानसभेचा फाॅर्म्युला तिन्ही पक्षांचे नेते बसून ठरवतील. भाजप मोठा पक्ष म्हणून आम्हाला अधिक जागा मिळतील. परंतु इतर पक्षांचा सन्मान राखला जाईल. तसेच भविष्याच्या दृष्टीने आमची चर्चा सुरू आहे. तुम्हाला काही माहिती मिळते ते मिळू द्या, आमच्यात काही गडबड नाही असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
पुण्यात दुसरे ब्लड सॅम्पल दिले
पुण्यात अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी दुसरे ब्लड सॅम्पल दिले हे समोरे आले आहे. ही गंभीर बाब आहे. पोलिस या प्रकरणात कारवाई करत आहे. तसेच गृह खात्याचे देखील याकडे लक्ष आहे असे ते म्हणाले.
Amit Shah : मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर फुटणार पराभवाचे खापर
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात
संजय राऊत यांच्याविषयी विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी बोलणे टाळले. मला विचारू नका ते गांजा पिऊन लेख लिहितात. त्यांना चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाची गरजआहे, असे सांगितले.
नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान
फडणवीस म्हणाले, सहा टप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपले. त्यातील निष्कर्षाच्या आधारे मोदींना बहुमत मिळाले आहे. आणि तेच पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला.
बीड मध्ये दोन्ही समाजातील जाणत्या नेत्यांनी असा प्रयत्न थांबवावा असे आवाहन देखील फडणवीस यांनी केले.