महाराष्ट्र

Political Leaders : राजकीय पक्ष, पुढाऱ्यांचे लक्ष मतमोजणीकडे !

Counting Training : 600 अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण

लोकसभा निवडणुकीसाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. आता राजकीय पक्षांसह नागरिकांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. त्यानुसार निवडणूक विभागाकडूनही मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली जात आहे. यामध्ये सोमवार आणि मंगळवारी निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांतील मतयंत्रे येथील एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामातील स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार मतमोजणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार मतमोजणीला आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

सोमवारी दोन्ही मतदारसंघांतील 600 हून अधिक मतमोजणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. संभाजीराजे नाट्यगृहात हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील सर्वच उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांची उपस्थिती होती. सीलबंद असणारी मतदान यंत्रे राजकीय पक्षांच्या मतमोजणी एजंट्ससमोर कशा प्रकारे हाताळावी, याची माहिती या प्रशिक्षणामध्ये देण्यात आली.

प्रशिक्षणाच्या दरम्यान मतदानाच्या आदल्या दिवशी व मतदानाच्या दिवशी करावयाचे कामकाज, कर्तव्य व अनुषंगाने प्राप्त अधिकार त्याप्रमाणे EVM VVPAT हाताळणी, जुळवणी याबाबत सर्व सेक्टर ऑफीसर यांनी एकत्रीतपणे नाटीका सादर करून कामकाजाचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

Rain Issue : सर आली धावून; आमदाराचे सोलर पॅनल गेले वाहून…

प्रशिक्षण कशाचे ?

जळगाव आणि रावेर लोकसभा एक मतदारसंघाच्या मतमोजणीच्यावेळी अभिरूप मतदान घेणे, कंट्रोल युनिट व VVPAT मोहोरबंद करणे, घोषणापत्र तयार करणे, प्रदत्त मतदान नोंदविणे अंध, दिव्यांग, जेष्ठ नागरिक, गैरहजर-स्थलांतरीत-मयत (ASD), तृतीयपंथी, परदानशीन, आक्षेपित मत नोदंविणेबाबतचे सहमतीपत्रे व घोषणापत्रे तयार करण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

मतदान संपल्यानंतर पुरूष, महिला, तृतींयपंथी व एकुण मतदानाची टक्केवारी यांची नोंद घेणे, संविधानिक /असंविधानिक पाकिटे भरणे, नोंदविलेल्या मतांचा हिशोब, केंद्राध्यक्षाची दैनदिंनी, PS-O5, केंद्राध्यक्षांचे छाननी तक्ता, केंद्राध्यक्षांचा अहवाल 1 ते 5 आणि 16 मुद्द्यांचा अहवाल भरावयाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!