देश / विदेश

EVM Machine : एलॉन मस्क म्हणाले, ‘ईव्हीएम’ होऊ शकते हॅक.. 

Elon Musk : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे करा रद्द

EVM Hack : देशात नुकत्याच लोकसभा निवडणुक पार पडली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी निवडणुकीतील इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) संदर्भात नवीन वाद सुरू केला आहे. एलॉन मस्क म्हणाले की, निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा वापर थांबवला पाहिजे, कारण ते हॅक होण्याची शक्यता आहे. एलॉन मस्क यांच्या या विधानामुळे भारतात निवडणुकांमध्ये ईव्हीएमच्या वापराबाबत वादाला तोंड फुटले आहे. 

 

निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएमवर आता शंका घेतल्या जात आहे. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते, असा दावा केल्याने भारतात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ईव्हीएम मशीनच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. मात्र, ईव्हीएमच्या बाजूने आणि विरोधात दोन्ही बाजूंनी वाद सुरू आहेत. निवडणुकीपूर्वीच यासंबंधीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने विविध तांत्रिक आधारावर हे यंत्र हॅक करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सिद्ध केले होते.

 एलॉन मस्क यांच्या ट्विटमध्ये काय?

 

एलॉन मस्क यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे रद्द केली पाहिजे, कारण मशीन किंवा AI हॅक होण्याचा धोका अजूनही खूप जास्त आहे. या ट्विट नंतर देशासह महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.

मतदान केंद्रावर फोन वापरल्याप्रकरणी गुन्हा 

 

मुंबई उत्तर-पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यावर 4 जून रोजी मतमोजणी केंद्रात मोबाईल फोन वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. “पोलिंग कर्मचारी दिनेश गुरव यांच्या तक्रारीवरून पंडिलकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मतमोजणी केंद्रावर अशा उपकरणांवर बंदी असतानाही एका अपक्ष उमेदवाराने मोबाईल फोनचा वापर केल्याचे लक्षात आले आणि त्यांनी रिटर्निंग ऑफिसरला सावध केले. आरओने वनराई पोलिसांकडे धाव घेतली.”

पांडिलकर यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 188 (अधिकृत आदेशाचे उल्लंघन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. मंगेश पांडिलकर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनशी (ईव्हीएम) जोडलेला फोन वापरत असल्याचा दावा गुरव यांनी केला होता. पोलिसांच्या हवाल्याने सूत्रांनी माहिती दिली की, हा मोबाईल फोन ईव्हीएम मशीन अनलॉक करणारा ओटीपी तयार करण्यासाठी वापरला होता.

Indian Army : एका जवानाचा मृत्यू, तर पाच गंभीर जखमी

ईव्हीएम’चा पहिल्यांदा वापर

ईव्हीएमचा भारतात पहिल्यांदा वापर 1982 मध्ये केरळमधील पोटनिवडणुकीत करण्यात आला. परंतु, न्यायालयाने या मशीन्सचा वापर नाकारला होता. 1991 मध्ये, बेल्जियम हा पहिला देश होता, जिथे निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरली गेली. पण खऱ्या अर्थाने तिथेही त्याचा पुरेपूर वापर 1999 पासून सुरू झाला. 1982 मध्ये भारतात पहिल्यांदा वापर झाल्यानंतर, 2003 च्या निवडणुकीत त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!