NCP Shiv Sena : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात आता अखेर महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार हे निश्चित झाले आहे. इथे शिंदेंच्या शिवसेनेने शशिकांत खेडेकर यांना उमेदवार दिल्यानंतर एका रात्रीतून मनोज कायंदे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या मतदारसंघासंदर्भात चर्चा सुरू होती. दोघांपैकी एकाला माघार घ्यावी लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र दुपारीपर्यंत दोघांपैकी एकानेही अर्ज मागे घेतला नसल्याने आता सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सोमवारी दुपारी तीनच्या ठोक्याला या मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. महाविकास आघाडीसमोर महायुतीचे आव्हान असेल, तरीही महायुतीत मात्र घटक पक्षातील द्वंद्व पाहावयास मिळाले. 18 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या प्रचारात कोण आघाडी घेणार, कोण पिछाडीवर राहणार याची चर्चा होईल. परंतु, 20 नोव्हेंबर रोजी मतदार आपला फैसला मतदान यंत्रात बंद करतील तोपर्यंत निवडणुकीचा धुरळा उडत राहणार आहे.
मतदारसंघातील 35 उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. 22 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत सहज वाटणारी निवडणूक 29 ऑक्टोबर रोजी वेगळ्याच वळणावर जाणार याचा सर्वांनाच अंदाज आला होता. 29 ऑक्टोबर रोजी शिदसेनेकडून डॉ. शशिकांत खेडेकर यांनी, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मनोज कायंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोन्ही उमेदवारांना पक्षांनी एबी फार्म दिल्याने एकच गोंधळ उडाला. मनोज कायंदे विरुद्ध डॉ शशिकांत खेडेकर विरुद्ध डॉ.राजेंद्र शिंगणे अशी ही लढत होणार आहे. मनोज कायंदे यांच्या उमेदवारीचा फटका कुणाला बसतो? हे 23 नोव्हेंबरला निकालाअंती कळणार आहे.
Nagpur MNC : गडकरी म्हणाले, ‘महापालिकेचे कंत्राटदार मोठ्ठे बदमाश’!
असे आहेत प्रमुख उमेदवार
सिंदखेड राजा या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ. राजेंद्र शिंगणे, शिदेसेनेकडून डॉ. शशिकांत खेडेकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मनोज कायंदे, वंचित बहुजनकडून सविता मुंडे प्रमुख उमेदवारांमध्ये लडत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, डॉ. राजेंद्र शिंगणे यांना गायत्री शिंगणे यांच्या रूपाने घरातील आव्हान कायम आहे. तर ज्या जिल्हा परिषद सर्कलमधून मागील वेळी डॉ. शिंगणे यांनी बऱ्यापैकी मताधिक्य घेतले होते
वर्डदी-सोनुशीमधून उद्योजक दत्तात्रय काकडे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. दुसरीकडे महायुतीतील शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पचार पक्षाने आपले उमेदवार अनुग्रामे डॉ. खेडेकर, मनोज कायंदे यांना कायम ठेवल्याने आपसातील सामना रंगणार आहे. कोण कोणाचे मताधिक्य घटवणार, कोणाचा कोणाला फायदा होणार याचे गणित मांडले जात आहे. इकडे महायुतीतील मोठा पक्ष असलेल्या भाजपची चांगलीच अडचण झाली आहे. या पक्षातील कार्यकर्त्यांना अद्याप वरिष्ठांच्या सूचना नसल्याने नेमके कोणाचे काम करायचे वा विवंचनेत कार्यकर्ते अडकले आहेत.