महाराष्ट्र

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपघातग्रस्तांसाठी धावून आले

Maharashtra Assembly : अपघातातील जखमी महिलेला ताफ्यातील ॲम्ब्युलन्स दिली

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचे पुन्हा एकदा दर्शन पाहायला मिळाले. एका अपघातग्रस्त महिलेसाठी ताफा थांबवून त्यांना मदत केल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यापूर्वीही अपघातग्रस्तांना मदतीसाठी धावून आल्याचे अनेकदा दिसून आले. राजकारणातील सर्वोच्च पदावर असतानाही इतरांप्रती असलेल्या संवेदनशीलतेमुळे मुख्यमंत्र्यांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षावर होतो आहे.

बुधवारी 10 जून रोजी विधिमंडळाच्या अधिवेशनाचा दहावा दिवस आहे. सकाळी अधिवेशनाला पोहोचण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे येथून निघाले. वाटेत त्यांना विक्रोळीजवळ अपघात झाल्याचे दिसून आले. एका रिक्षात बसलेल्यांचा अपघात झाला होता. या अपघाताबाबत कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेच आपला ताफा थांबविला. स्वत: मुख्यमंत्री त्यांच्या गाडीमधून बाहेर आले. त्यांनी जखमींची माहिती घेतली. त्यांनी सर्व जखमींची आस्थेने विचारपूस केली. यात एक वृद्ध महिला जखमी असल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ महिलेला रुग्णालयात नेण्याचे निर्देश संबंधितांना दिले. मुख्यमंत्र्यांनी महिलेल्या रुग्णालयात नेण्यात त्यांच्याच ताफ्यातील ॲम्बुलन्सने नेण्याचे बजावले. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी त्या जखमी महिलेला रुग्णालयात नेउन योग्य उपचाराची जबाबदारी ताफ्यातील एका अधिका-यावर सोपविली. जखमींना वेळेत उपचार मिळावेत यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड पाहून उपस्थितही अवाक झाले.

कौतुकाचा वर्षाव 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शिवाय त्यांच्या या संवेदनशीलतेबद्दल जखमी महिलेनेही मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. त्यांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे त्यांची संवेदनशील मुख्यमंत्री ही छबी पुन्हा एकदा नव्याने अधोरेखित झाली आहे.

Maharashtra Assembly : दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही

राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे नेते एकमेकांची उणीदुणी काढण्यातच व्यस्त असतात. अशात सर्वसामान्य जनतेलाही नेते केवळ सत्तेसाठीच भुकेले असल्याचा समज होउन जातो. राजकारण, सत्ता, खुर्ची याउपर नेतेही एक माणूस आहेत आणि त्यांनाही सर्वसामान्य माणसांप्रमाणे भावना आहेत हेच आपण कधी विसरून जातो. नेते विशेषत: मोठ्या पदांवरील व्यक्तींना प्रत्येकवेळी थेट जनतेत जाउन मिसळणे शक्य होत नसते.

पण त्यांच्यापुढे जर काही विपरीत घडताना दिसले असेल किंवा कुणी अडचणीत असल्याचे दिसून येत असेल तेव्हा मात्र त्यांच्यातील संवेदनशीलता पुढे येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संवेदनशीलपणा यापूर्वी देखील पुढे आला आहे. त्यांनी अपघातग्रस्तांना मदतीसाठी दाखविलेली तत्परता आपण यापूर्वीही पाहिली आहे. आज पुन्हा एकदा त्यांच्या या कृतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांप्रति जनतेमध्ये आदरभाव नक्की निर्माण झाला असेल.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!