Jalgaon District : राजकारणातील मुरब्बी नेते एकनाथ खडसे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांच्यातील राजकीय कटुता आणि आरोप प्रत्यारोप सर्वश्रुत आहे. राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतरही दोघांकडून आरोपांच्या फैरी झडत होत्या. मात्र, 13 मे रोजी गिरीश महाजन यांनी खडसेंबाबत आपले काही म्हणणे नाही, अशी प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे खडसे यांनीही महाजनांशी आपले मनभेद नव्हे, तर मतभेद असल्याचे सांगितले. त्यामुळे आता दोघांमध्ये मिले सूर मेरा तुम्हारा…या प्रमाणे दिलजमाई झाल्याची चर्चा आहे.
महाजन यांनी काल जामनेर येथे मतदान केल्यानंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, एकनाथ खडसे यांनी निवडणूक लढवावी की नाही हे त्यांचे मत आहे. त्यांच्या येण्याने भाजपवर काहीही परिणाम होणार नाही. ते भाजपमध्ये नव्हते तरी जिल्ह्यात दूध संघ, जिल्हा बँकेत यश मिळवले. मात्र, माझे आता त्यांच्याबाबत काहीही म्हणणे नाही. खडसे यांनीही कोथळी गावात मतदान केले. यानंतर ते म्हणाले, रक्षा खडसे यांच्यासाठी भाजप यंत्रणेकडून चांगले काम झाले आहे. महाजन यांनीही चांगले काम केले. महाजन यांच्यासोबत माझे मतभेद होते. मात्र, मनभेद कधीही नव्हते, असे ते म्हणाले.
एक लाख मताधिक्य देणार : गिरीश महाजन
जामनेर विधानसभा मतदारसंघातून खासदार रक्षा खडसे यांना एक लाखाचा लीड देणार असल्याचा दावा गिरीश महाजन यांना केला. रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचार सभेदरम्यान भाषण करताना ते बोलत होते.
आम्ही दिलेली वस्तू परत घेत नाही : पवारांचे वक्तव्य
एकनाथ खडसे म्हणाले, भाजपमध्ये येताना मी रोहिणी खडसे यांना भाजपमध्ये येण्यास सांगितले होते. मात्र,त्यांनी नाकारले आणि शरद पवार यांच्या सोबत राहील असे सांगितले. तिला पुढची निवडणूक लढवायची आहे. तिला तिथे भविष्य दिसतेय.
Nitin Gadkari : ‘ईयरएन्ड’ला करणार नितीन गडकरी दिल्या शब्दाची ‘पूर्ती’
मी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाचे काम करणार आहे. पण यापुढे निवडणूक लढवणार नाही. मी अजून पाच वर्ष परिषदेचा आमदार आहे. पवारांनी सांगितले आहे. आम्ही दिलेली वस्तू परत घेत नाही. मला शरद पवार यांनी अभय दिल्यानंतर इतर लोकं माझा विधान परिषदेचा राजीनामा मागत असतील तर मला त्याच्याशी देणंघेणं नाही.