प्रशासन

Earthquake : विदर्भातील काही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के !

Vidharbha : रिश्टर स्केलवर 5.3 तीव्रतेच नोंद, कुठेही जीवित हानी नाही 

5.3 intensity on the Richter scale : आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. शेजारच्या तेलंगणा राज्यातही हे धक्के जाणवल्याची माहिती आहे. भूकंपाच्या तीव्रतेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने कुठेही, कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले नाही. 

भूगर्भ विभागाच्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली असून त्याचे केंद्रस्थान तेलंगणातील भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भूकंपाचे झटके जाणवताच नागरिक झोपेतून जागे झाले आणि घाबरून घराबाहेर धाव घेतली. “आम्ही झोपलेलो असताना अचानक बेड हलू लागला. सुरुवातीला काय झाले हे समजले नाही, पण लगेच आम्ही घराबाहेर पळालो,” असे गोंदियातील एका रहिवाशाने सांगितले. भंडारा जिल्ह्यातही अनेक नागरिकांनी हीच अनुभूती सांगितली.

भूकंपाच्या सौम्य तीव्रतेमुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नसली तरी नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. काही ठिकाणी लहान-मोठे फाटे निर्माण झाले असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. घटना घडताच जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तात्काळ सक्रिय झाल्या. प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Mahayuti : आई‘शप्पथ’! मुंबईला जाणाऱ्या गाड्या हाऊसफुल्ल!

विशेष पथक तैनात

जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. धोका टाळण्यासाठी भूकंपग्रस्त भागांमध्ये सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेच्या पृष्ठभूमीवर प्रशासनाने संभाव्य भूकंपांसाठी पूर्वतयारी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत सतर्कता बाळगावी आणि प्रशासनाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळसह इतर काही जिल्ह्यांसाठी आजची सकाळ घाबरवणारी ठरली. सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. नागरिकांनी शांतता राखत प्रशासनाच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवण्याची गरज आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदु तेलंगणा राज्यातील मुलुगु 

तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के गडचिरोली जिल्ह्यात जाणवले आहे. अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारतीबाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा,असे आवाहन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!