महाराष्ट्र

Earthquake in Nagpur : लहान भूकंप होण्याची शक्यता

Geographic Study : तुरळक स्वरूपाच्या हालचालींचा होणार अभ्यास

Nagpur district : नागपूर परिसरात भूकंपाच्या हालचालींची नोंद होत आहे. 3 ते 9 मे 2024 दरम्यान, नागपूर परिसरात 2.4 ते 2.7 तीव्रतेचे भूकंप सिस्मोग्राफवर नोंदवले गेले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) द्वारे प्रसिद्ध केलेल्या सिस्मोग्राफमध्ये मागील भूकंपाच्या घटनांची नोंद करण्यात आली होती.जी सर्वसामान्य जनतेला जाणवली नाही.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी, नवी दिल्ली, पृथ्वीविज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत एक विभाग आहे. भूकंपाच्या घटनांचा अहवाल देण्यासाठी ती नोडल एजन्सी आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने प्रसिद्ध केलेल्या भूकंप प्रवण क्षेत्राच्या नकाशात, नागपूर क्षेत्र भूकंपासाठी कमी संवेदनाक्षम असलेल्या झोन-II अंतर्गत येते. मोठ्या भूकंपांपासून नागपूर क्षेत्र तुलनेने सुरक्षित मानले जाते. तरी या भागात छोटे भूकंप (Micro Earthquake) होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याआधीही भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (भाभूस) संस्थेने भूकंपांबाबत वेळोवेळी अभ्यास करून अहवाल जारी केले आहेत.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, मध्य क्षेत्र या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. स्थानिक प्रशासनाच्या विनंतीवरून, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, मध्य क्षेत्राच्या आगामी क्षेत्रीय कार्यक्रमांमध्ये नागपूर क्षेत्रीय तपास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात भूगर्भशास्त्रज्ञ सविस्तर अभ्यास करून तुरळक भूकंपाची कारणे शोधण्याचा प्रयत्न करतील. मध्य क्षेत्रातील भूकंप भूविज्ञान विभागातील शास्त्रज्ञ या भूकंपांचे मॅपिंग आणि संवेदनशीलता यावर सतत काम करत आहेत. यापूर्वी फेब्रुवारी 2024 ते एप्रिल 2024 दरम्यान अशा प्रकारच्या 06 घटनांची नोंद झाली आहे.

Raj Thackeray : नियोजन शून्यतेमुळे पुणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

7.5 रिश्टर स्केलवर विनाशकारी

5 रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद असल्यास त्या भागाला परिणाम जाणवतो. परंतु 7.5 रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता विनाशकारी राहते. जमिनीला भेगा पडणे, इमारतींना तडे जाणे असा विनाश होतो, असे भूगर्भ शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

परभणी, हिंगोलीला धक्का

अशातच मराठवाड्यातील हिंगोली, परभणी भागात भूकंपाचे धक्के जाणवले. विदर्भ, मराठवाड्यातील भूगर्भ हालचालींकडे शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!