Monsoon Session : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कलिना संकुलाचा मुद्दा विधान परिषदेत गाजला. विधान परिषदेत शुक्रवारी (ता. 28) दुसऱ्या दिवशी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील विषय गाजला. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत विरोधकांनी कलिना संकुलातील मुद्यावर प्रश्न उपस्थित केला. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील मुलींच्या नवीन वसतिगृहातील 40 पेक्षा अधिक विद्यार्थिनींची प्रकृती खालावली. वसतिगृहातील दूषित पाण्यामुळे हा प्रकार घडला. त्यामुळे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
विलास पोतणे यांच्या म्हणण्यानुसार दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या न्यू गर्ल्स वसतिगृहाची दयनीय अवस्था झाली आहे. खोलीच्या स्लॅबमुळे विद्यार्थिनींच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या प्रश्नावर शासन गंभीर नाही. यासाठी कोणत्या उपाययोजना करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमदार प्रवीण दरेकर, अनिल परब, मनीषा कायांदे, सत्यजित तांबे यांच्यासह अन्य नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला. कलिना संकुल परिसरात डेंग्यूची साथ पसरत आहे. त्याचा फटका विद्यार्थिनींना बसत आहे, असे आमदारांनी सांगितले.
परब आक्रमक
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आक्रमकपणे मुद्दा मांडला. त्यांनी सांगितले की, देशातील सर्वांत वाईट परीस्थिती कलिना येथे आहे. अनेक विद्यापीठांना भेट दिली. पण कलिना सारखी वाईट परीस्थिती पाहिली नाही. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुल परिसरात झुडपी जंगल उगवले आहे.
Sudhir Mungantiwar : कल्याणकारी संकल्पना साकार करणारा अर्थसंकल्प
केव्हाही साप दिसतात. त्यामुळे कामाचे टेंडर घेणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. चंद्रकांत पाटील यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, यासंदर्भात नियोजन करण्यात येणार आहेत. समिती गठीत करून त्यावर तत्काळ निर्णय घेण्यात येईल.