प्रशासन

Acute Power problem : अकोला शहरात विद्युत समस्या तीव्र

Resentment  : प्रहारने महावितरणच्या अधिकाऱ्याला दिला कंदील भेट!

Civic issue :  जिल्ह्यात असह्य होणारा उन्हाळा आणि भरीस भर म्हणजे वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. विशेषत: जुने शहर भागात ही समस्या उग्र झाली आहे. आमदार बच्चू कडू प्रणित प्रहारच्या वतीने अनोखे आंदोलन करीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. निषेध म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्याला कंदील भेट दिला.

जिल्ह्यात याही वर्षी तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. उकाड्याने नागरिक हैराण आहेत. या त्रासापासून वाचण्यासाठी विजेवर चालणाऱ्या उपकरणाचा नागरिकांना सहारा आहे. मात्र,उपकरणे विजे अभावी बंद असल्याचा प्रकार अकोल्यातील जुने शहर परिसरात वारंवार घडत आहे. वारंवार तक्रारी देण्यात आल्या. मात्र फायदा झाला नाही. अखेर प्रहार पक्षाच्या वतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले. अधीक्षक अभियंता यांना कंदील भेट दिला.

Lok Sabha Election : मेळघाटात रस्ता नाही, वीज नाही; मतदानही नाही

सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याला त्रासलेल्या नागरिकांनी प्रहारचे महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्या ही बाब आणून दिली. पाटील यांनी जुने शहर परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली. अन्यथा लोड शेडिंग जाहीर करा. किंवा यावर कुठलीही कार्यवाही न झाल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन करू व या आंदोलनाला सर्वस्वी जबाबदार महावितरण राहील असा इशारा देण्यात आला.

प्रहारने अधिकाऱ्यांना दिला कंदील!

वारंवार होणाऱ्या वीजपुरवठ्याला कंटाळून प्रहार ने आंदोलन करत महावितरणचा निषेध नोंदवला. यावेळी वीज पुरवठा नियमित करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. प्रहार आपल्या अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहे. आजही प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे अधिकारी पवनकुमार कछोट यांना कंदील भेट म्हणून देत निषेध नोंदवला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!