महाराष्ट्र

Maharashtra Lok Sabha Election : आजही माझा परिवार एका बाजूला

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले कौटुंबिक शल्य

Pawar vs Pawar : या लोकसभा निवडणुकीत कधी नव्हे ते पवार विरुद्ध पवार अशी लढत बारामती मतदारसंघात आहे. प्रचारा दरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौटुंबिक वस्तूस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते हळवे झालेले दिसले. आजही माझा परिवार एका बाजूला अशा शब्दात त्यांनी शल्य बोलून दाखवले.

ते म्हणाले, “1962 च्या पोटनिवडणुकीत माझे काका स्व. वसंतदादा पवार यांनी शेकापमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा आजी-आजोबा आणि अन्य त्यांच्या बाजूने होते; तर शरद पवार काँग्रेसचे काम करीत होते. आजही माझे थोरले बंधू राजेंद्र पवार, धाकटे बंधू श्रीनिवास पवार आणि पवार साहेबांचा परिवार एका बाजूला आणि माझा परिवार एका बाजूला आहे.”

सुनेत्रा पवारांबाबत पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय

“राष्ट्रवादी पक्षात हुकूमशाही नाही. लोकशाहीने इथे निर्णय घेतले जातात. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवावी हा निर्णय मी घेतलेला नाही. तो निर्णय पार्लमेंटरी बोर्डाने घेतलेला आहे. पार्लमेंटरी बोर्डाने काही नावे सुचवली, त्यांत सुनेत्रा पवार यांचेही नाव होते. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, आपल्याला निवडणुकीला उभे करण्याचा निर्णय झाला तर ती आपल्याला ती जागा लढवण्याची मानसिकता तयार करा. त्यानुसार त्यांनी आपली मानसिकता तयार केली आणि पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली.”

Maharashtra Lok Sabha Election : रक्षा खडसेंच्या विरोधात प्रहार संघटना रस्त्यावर

सामान्यांना न्याय देण्यासाठी हवी सत्ता

“सत्ता असल्याशिवाय बहुजन, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाचा विकास होत नाही, असे यशवंतराव चव्हाण नेहमी सांगायचे. विरोधात असताना आंदोलन करू शकतो, मोर्चे काढू शकतो, उपोषणही करू शकतो. मात्र, सामान्य माणसाचा विकास करण्यासाठी सत्ता आवश्यक आहे. त्यासाठीच मी सत्तेत सहभागी झालो आहे. पवार साहेब म्हणाले म्हणून सन 2019 ला मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली होती.”असे अजित पवार यांनी सांगितले.

पार्थ पवार राज्यसभेवर जाणार?

सन 2019 च्या निवडणुकीत 48 जागांपैकी 41 जागा भाजप-शिवसेनेला होत्या. त्यानुसारच जागावाटप झाले आहे. छत्रपतींच्या गादीपैकी कोल्हापूरची गादी महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे साताऱ्याची गादी महायुतीकडे असावी, म्हणून भाजपकडून उदयनराजे यांना उमेदवारी देण्यासंदर्भात निर्णय झाला. ही जागा एवढी वर्षे राष्ट्रवादीच लढवत होती; परंतु त्या बदल्यात राज्यसभा देण्याचे आश्वासन देण्यात आले व ती देण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणेच परभणीतही आमचा उमेदवार निवडून येण्याची खात्री असतानाही आम्ही ही जागा रासपच्या महादेव जानकरांना सोडली. असा खुलासा अजित पवार यांनी केला. ही राज्यसभेची जागा पार्थ पवार यांना द्यायची की अन्य कोणाला, याबाबतचा निर्णयही पार्लमेंटरी बोर्डच घेईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!