महाराष्ट्र

Tumsar Constituency : राजू भाऊ, मन मे लड्डू फूटा !

Ajit Pawar : कारेमोरे रॉक अन् चंद्रिकापुरे वेट अँड वॉच

Assembly Election : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा सुरू आहे. यात्रेच्या सर्वात जास्त फायदा कोणाला झाला असेल तर तो भंडारा जिल्ह्यातील मोहाडी – तुमसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू कारेमोरे यांना. त्याला कारणही तसेच आहे. भंडारा जिल्ह्यात आलेल्या यात्रेदरम्यान अजित पवार यांनी विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांची टिकीट फायनल केली आहे. 

मोहाडी तुमसर मध्ये दावा

मोहाडी तुमसर विधानसभा मतदारसंघावर दावा करत त्यांनी या जागेवर राजू कारेमोरे लढतील, अशी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे सोबत मोरगाव-अर्जुनीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे उपस्थित असतानासुद्धा त्या मतदारसंघाबाबत दादांना ‘ब्र’सुद्धा काढला नाही. त्यामुळे चंद्रिकापूरे यांच्याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. आज तुमसरात घडलेल्या राजकीय घडामोडी बघता राजू कारेमोरेंच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले. ते पाहून त्यांना सर्वजण ‘राजू भाऊ, मन मे लड्डू फूटा!’, असे म्हणत आहेत.

दादांचा वादा..

शनिवारी (ता. 28) अजित पवार तुमसरात जनसन्मान यात्रा घेऊन आले. त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल होते. या दोघांनी राजू कारेमोरे यांच्या केलेल्या कामाची पोचपावती दिली. आपल्या भाषणात कारेमोरे यांची टिकीट फायनल करून गेले आहेत. राजू कारेमोरे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहनही नेत्यांनी लाडक्या बहिणींना केले. कारेमोरे यांच्या गळ्यात पुन्हा आमदारकीची माळ घातल्यास पाच वर्षांच्या हिशोबाने पाच हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचा वादाही अजित दादांनी केला आहे.

विशेष म्हणजे या जनसन्मान यात्रेच्या व्यासपीठावर गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव-अर्जुनी विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरेही होते. त्यांच्या तिकिटाबाबत शब्ददेखील न काढल्याने त्यांच्या तिकिटाबाबत अद्याप फायनल न झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अजित दादा मनोहर चंद्रिकापुरे यांच्यावर नाराज तर नाही ना, अशी चर्चा रंगू लागली आहे.

पुन्हा कारेमोरे-वाघमारे थेट लढत..

महायुतीत मोहाडी-तुमसर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाने उमेदवार घोषित केला. विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांना पुन्हा तिकीट मिळणार असल्याचे कन्फर्म झाले आहे. त्यामुळे राजू कारेमोरे यांची थेट लढत त्यांचे परंपरागत राजकीय वैरी माजी आमदार चरण वाघमारे यांच्याशी होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

महाविकास आघाडीमध्ये याच जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसनेसुद्धा दावा केला आहे. आघाडीत ही जागा कुणाला जाते. त्यांच्याकडून उमेदवार कोण असेल, हेही पाहणेही विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र आजचा दिवस राजू कारेमोरे यांच्यासाठी ‘बडा दिन’ ठरला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!