Ubatha : आमचा पक्ष हा गुंडांचा पक्ष आहे, असे म्हणणाऱ्या लोकांच्या मशालीतील तेल केव्हाच संपले आहे. अशी मशाल घेऊन एक उमेदवार उभा आहे. दुसरीकडे एक शिट्टी घेऊन उभा आहे. या शिट्टीने तुमच्या समस्यांचा आवाज वरती पोहोचू शकणार नाहीत. पण अशा परिस्थितीत उबाठासारखे हाडं तोडणारे नाही, तर हाडं जोडणारे आणि त्यासोबत मनं जोडणारे डाॅ. हेमंत विष्णू सावरा आहेत, असे म्हणत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे कौतुक केले.
विष्णू सावरा मुनगंटीवार यांच्यात साम्य
आज (ता. १६) पालघरच्या सातपाडी येथे जाहीर सभेला संबोधित करत होते. ते म्हणाले, कार्यकर्त्यांना माया लावणारे विष्णू सावरा यांच्या आणि माझ्यात एक साम्य आहे. ते सहा टर्म आमदार होते आणि मीसुद्धा सहा टर्म झाल्या आमदार आहे. राजकारणात त्यांनी कधीही घमेंड बाळगला नाही. महायुतीचे उमेदवार म्हणून अस्थिरोगावर अचूक निदान करणारे, हाडं जोडणारे आणि हाडं जोडता-जोडता मनं जोडणारे डाॅ. हेमंत विष्णू सावरा आहेत. इतरांच्या वेदना कमी करणारे तुमचे उमेदवार आहेत.
शिवसेना हाडं मोडणाऱ्यांची शिवसेना
विचारांचं तेल संपलेली मशाल घेऊन एक उमेदवार उभा आहे. दुसरीकडे शिट्टी घेऊन उभा आहे. त्यांना निवडून दिले तरी शिट्टीच्या आवाजात विकासाचा आवाज दबून जाणार आहे. आमचा पक्ष गुंडांचा पक्ष आहे, असे सांगणारी उबाठा यांची शिवसेना हाडं मोडणाऱ्यांची शिवसेना आहे. तर इकडे हाडं जोडणारे उमेदवार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
मोबाईलचे सीम कार्ड टाकायचे असेल तर आपण दहा वेळा विचार करतो की, टाॅवर कोणता चांगला आहे, सिग्नल कोण चांगले देईल. सिग्नलच नसलेले सीम कार्ड टाकले तर आपल्या आवाजच पलिकडे पोहोचत नाही. १० उमेदवार घेऊन राष्ट्रवादीचा पंतप्रधान होणार नाही. म्हणजे त्यांचा टाॅवर बाद झाला. दुसरा टाॅवर म्हणजे बिना तेलाची मशाल. जो हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार होता, तो आता राहिलेला नाही. ही मशाल फक्त चित्रापुरती उरली आहे, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टिका केली.
Vanchit Bahujan Aghadi : काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यावर गुन्हा दाखल!
२० च्या २० ही उमेदवार त्यांचे निवडून निवडून आले तरी त्यांचाही पंतप्रधान होणार नाही. त्याच्यामुळे हे दोन टाॅवर फेल गेले. राहिल तिसरा टाॅवर म्हणजे इंडिया आघाडी. तर त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार गोपनीय आहे. कारण त्यांना भीती आहे की, उमेदवार घोषीत केला, तर त्यांचा बेंदा फाक होईल, म्हणून त्यांनी उमेदवार गोपनीय ठेवला आहे. तो घोषीत करण्याची हिंमतही त्यांच्यात नाही. कारण घोषणा केली तर जे आज सोबत दिसतात, तेसुद्धा गायब होऊन जातील, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांना कानपिचक्या घेतल्या.