महाराष्ट्र

Chandrapur District Bank : संतोष रावत यांचा कारनामा काँग्रेसला घेऊन बुडणार 

Recruitment Process : आचारसंहिता काळात दलितांचे आरक्षण हटवल्याचा ठपका 

Complaint For Action : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरतीत मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाशी छेडछाड केल्याप्रकरणी काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांच्या विरोधात डॉ.गावतुरे यांनी तक्रार केली आहे. बँकेमध्ये सुरू असलेल्या नोकर भरतीदरम्यान एसी, एसटी, ओबीसी आणि विमुक्त भटक्या जमातीचे आरक्षण ऐनवेळी रद्द करण्यात आले. या निर्णयामुळे आरक्षित समाजाचे मोठे नुकसान होणार आहे. बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी परस्पर घेतलेल्या या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे. रावत काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांचा प्रताप काँग्रेसला घेऊन बुडेल, असा संताप आता काँग्रेसमध्येच व्यक्त होत आहे.

दुरुपयोग

डॉ. राकेश गावतुरे यांच्या सोबतच राजू कुकडे यांनीही आचारसहिंता काळात बँकेच्या अध्यक्षपदाचा दुरुपयोग होत असल्याचे मनसेचे म्हणणे आहे . बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या देखरेखीत नोकर भरती प्रक्रिया ऐन निवडणुकीच्या काळात होत घेण्यात येत आहे. बँकेने प्रकाशित केलेल्या जाहिरातीनुसार ऑनलाइन फॉर्म भरण्याची मुदत 19 ऑक्टोबर होती. परंतु ही मुदत आचारसंहिता लागू असतानाही 22 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली. परीक्षा फी भरण्याच्या मुदतीत देखील वाढ करण्यात आली. आता ही मुदत 25 ऑक्टोबर करण्यात आली आहे.

बँकेकडून प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातमध्ये सुद्धा बदल करण्यात आला. यासंदर्भात सर्वोच्य न्यायालयाने काही आदेश दिले आहेत. त्यानुसार सरकारी, निमसरकारी किंवा कोणत्याही संस्थेच्या नोकरभरती प्रक्रियेत सुरुवातीला जी जाहिरात प्रसिद्ध होते, त्यानुसारचं भरती प्रक्रिया राबवावी लागते. त्यात ऐनवेळी कोणताही बदल करता येत नाही. परंतु चंद्रपुरातील सहकारी बँकेने पण फॉर्म भरण्याची मुदती व जाहिरातीत बदल केला आहे.

आरक्षण रद्द केलं

चंद्रपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष रावत हे स्वतः विधानसभा निवडणूक लढत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी बँकेच्या जाहिरातीत आणि मुदतीत बदल केल्याचा आरोप आता होत आहे. हा बदल करताना संतोष रावत यांनी शासनाचा कोणताही निर्णय किंवा आदेश नसताना परस्पर मुदतवाढ दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. जिल्हा बँकेतील नोकर भरती आरक्षण लागू झाले आहे. यानंतरही संतोष रावत यांनी आरक्षण रद्द करून नोकर भरती सुरू केली आहे.

Chandrapur Bank : गावतुरे म्हणाले, संतोष रावत यांनी बोगस कामे केली

प्रकरण येणार अंगलट

रावत यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बँकेची संबंधित अनेकांना सानुग्रह अनुदानाचे वाटप केले. हा देखील आचारसंहिताचा भंग असल्याचे तक्रार मनसेचे उपाध्यक्ष राजु कुकडे यांनी केली आहे. यासोबतच आचारसहिंता भंग केल्याप्रकरणी संतोष रावत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी देखील डॉ. राकेश गावतुरे यांनी केली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बँकेचे प्रकरण रावत यांच्या अंगलट येण्याची चिन्हे, स्पष्टपणे दिसत आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!