महाराष्ट्र

Baba Siddique : धमकी मिळाल्यानंतर दिली होती सुरक्षा

Mumbai Firing : बिश्नोई गँगकडून हल्ला झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष

Personal Revenge : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तात्काळ दोन मारेकऱ्यांना अटक केली आहे. दोघे बिश्नोई गँगचे सदस्य असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गोळीबारामागे वैयक्तिक शत्रूत्व किंवा राजकीय कारण होते का? याचाही तपास केला जात आहे. बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांच्यात जवळचे संबंध होते. त्यामुळे हल्ल्याचा संबंध बिश्नोई गँगशी आहे काय, हे तपासले जात आहे.

सिद्दीकी यांच्यावरील गोळीबार प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. कर्नेल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी त्यांची नावे आहेत. बिश्नोई गँगचे सदस्य असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. कर्नेल सिंह हा हरियाणाचा आहे. धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशमध्ये राहणारा आहे. हल्ल्यापूर्वी सुमारे एक महिन्यांपर्यंत सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. शनिवारी (12 ऑक्टोबर) सिद्दीकी यांच्यावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्ल्यासाठी 9.9 एमएमचे पिस्तुल वापरण्यात आले. सिद्दीकींना छातीवर दोन गोळ्या मारण्यात आल्या. दोन्ही गोळ्या शरीराच्या आरपार गेल्या होत्या. सिद्दीकींच्या एका सहकाऱ्याच्या पायालाही गोळी लागली.

Vijay Wadettiwar : सुरक्षा असताना सत्ताधारी नेत्याची हत्या

वेगाने सूत्रं हलली

सिद्दीकी यांच्यावरील हल्ल्यानंतर खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) रुग्णालयात दाखल झालेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करून माहिती घेतली. अभिनेता संजय दत्त रुग्णालयात पोहोचले. सिद्दीकींना रुग्णालयात आणलं, तेव्हा त्यांची पल्स मिळत नव्हती. ब्लड प्रेशरही नव्हतं. डॉक्टरांनी काढलेला ईसीजीही निरंक आला. रक्तस्त्राव थांबावा आणि ब्लड प्रेशर सुयोग्य व्हावं, म्हणून डॉक्टरांनी प्रयत्न केले. मात्र त्यांचे प्राण वाचू शकते नाही. रात्री 11.25 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

बाबा सिद्दीकी हे तीन टर्म आमदार होते. 1999, 2004 आणि 2009 मध्ये त्यांनी निवडणुकीत विजय मिळविला. काँग्रेसचे ते आमदार होते. 2004 ते 2008 दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. 2014 मधील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2019 मध्ये सिद्दीकी यांनी निवडणूक लढविली नव्हती. मुलगा झिशान सिद्दीकी याला वांद्रे पूर्वमधून संधी मिळाली. झिशान विजयी झालेत. काही दिवसांपूर्वीच सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत अनेक बॉलीवूड स्टारची रेलचेल असायची. शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त आदी अभिनेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!