Voting : जवळपास सर्व एक्झिट पोलने NDA साठी 350 ते 415 जागांसह प्रचंड बहुमताचा अंदाज वर्तवला आहे. ‘ॲक्सिस माय इंडिया’ ने ‘एनडीए’साठी 361-401 चा अंदाज वर्तवला आहे. ज्या 2019 मध्ये भाजपला मिळालेल्या जागांपेक्षा चांगल्या आहेत.
एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर लगेचच ज्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या मोठ्या विजयाचा अंदाज लावला होता, त्या प्रशांत किशोर यांनी लोकांना संदेश दिला. “निरुपयोगी चर्चा” आणि “विश्लेषण” यापासून दूर राहण्याचा सल्लात्यांनी दिला. निवडणुकीच्या काळात निष्क्रिय लाऊडमाउथ राजकारणी आणि स्वयंघोषित सोशल मीडिया तज्ञांनी” प्रदान केल्या क्षुल्लक गोष्टींपासून दूर रहा, असेही प्रशांत किशोर म्हणाले.
सावध राहा
पुढच्या वेळी निवडणूक आणि राजकारणाची चर्चा असेल तेव्हा, सावध राहा. लाऊडमाउथ राजकारणी आणि स्वयंघोषित सोशल मीडिया तज्ञांपासून दूर राहा. निरुपयोगी चर्चा आणि विश्लेषणांवर तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका,” असे प्रशांत किशोर यांनी 1 जुन रोजी X वर लिहिले. यापूर्वी, किशोर यांनी भाकीत केले होते की एनडीए एकतर आपली सध्याची संख्या कायम ठेवेल.
ताकदही वाढवेल. पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि ओडिशामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. तेलंगणात भाजपला 6 ते 9 जागा मिळतील असा अंदाजही त्यांनी वर्तवला होता. ॲक्सिस माय इंडियाने बंगालमध्ये भाजपला 26-31, तेलंगणात 11-12 आणि ओडिशात 18-20 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
काय होते भाकीत
किशोर यांचा अंदाज एक्झिट पोलशी जुळणारे दिसत आहेत. तमिळनाडू आणि केरळमध्ये भाजपची मतांची टक्केवारी आणि जागा वाढतील. त्यांचे हे भाकीत एक्झिट पोलनुसार खरे ठरले आहे. विशेष म्हणजे, योगेंद्र यादव यांच्यासह काही राजकीय विश्लेषकांनी उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन भाजप बहुमताच्या तुलनेत कमी पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता.
कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपने जवळपास सारख्याच जागा राखल्या आहेत. महाराष्ट्रात 2019 मध्ये भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. यावेळी 20-22 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तथापी एनडीएची संख्या 2019 मध्ये 41 वरून 28-32 पर्यंत खाली येऊ शकते दहा जागांचे नुकसान.
आंध्रचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी या निवडणुकीत पराभूत होतील ही किशोरची भविष्यवाणी खरी ठरू शकते कारण बहुतेक एक्झिट पोलने लोकसभा निवडणुकीत वायएसआरसीपीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली आहे. ॲक्सिस माय इंडियानुसार एनडीएला आंध्रमध्ये 21-23 जागा आणि वायएसआरसीपीला 2-4 जागा मिळण्याची शक्यता आहे. YSRCP ने 2019 मध्ये लोकसभेच्या 25 पैकी 22 जागा जवळपास 50 टक्के मतांनी जिंकल्या.