महाराष्ट्र

Eknath shinde : प्रकाश आंबेडकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र!

Prakash Ambedkar : दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका

Shiv Sena : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षाभूमी (नागपूर), बुद्ध लेणी (औरंगाबाद), अकोला आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतील. या अनुयायांकडून टोल वसूल करू नये, अशा मागणीचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने टोल न घेण्याची मागणी करण्यात आली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवास करणाऱ्या बौध्द अनुयायांसाठी आकारण्यात येणारा टोल माफ करावा असं पत्रामध्ये म्हटलं आहे.

शिंदे यांना पत्र

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा बौद्ध धर्मियांचा एक महत्त्वाचा सण आहे. दरवर्षी अनुयायी हा दिवस साजरा करतात. महाराष्ट्रासह देशभरातील लाखो अनुयायी या दिवशी नागपूरला येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी नागपूर इथं आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. म्हणून हा दिवस ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयादशमी दिनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तो दिवस जगभरातील अनुयायांसाठी सन्मानाचा मानला जातो, असे आंबेडकर यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. ‘दरवर्षीप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 12 ते 13 ऑक्टोबर 2024 दरम्यान दिक्षाभूमी नागपूर, बौद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी लाखो बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी प्रवास करत असतात. महाराष्ट्र आणि देशभरातील ग्रामीण भागातून लोक येथे तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करत असतात. आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून मागणी करतो की, आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवास करणाऱ्या बौध्द अनुयायांकडून आकारण्यात येणारा टोल माफ करावा.’

दीक्षाभूमी सजली

नागपुरात बौद्ध बांधवांचे स्वागत करण्यासाठी दीक्षाभूमी सजली आहे. दोन दिवस आधीपासूनच गर्दी होऊ लागली आहे. परिसरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गस्त ठेवली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची पूर्ण काळजी पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी घेतली आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत नागपुरातील रेल्वे स्थानक व बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात अनुयायांची गर्दी असेल, असे सांगण्यात येत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!