महाराष्ट्र

Chandrapur Co-operative Bank : भरती प्रक्रिया रद्द करण्यासाठी मनसे आक्रमक !

Raju Kukde : बॅंकेच्या वरोरा शाखेसमोर आरक्षणासाठी केली तीव्र निदर्शने

Chandrapur : आरक्षण हा मुद्दा या निवडणुकीत चांगलाच तापत आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत पदभरतीमध्ये बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांनी आरक्षण मोडीत काढल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी केला आहे. यासाठी त्यांनी बॅंकेच्या वरोरा शाखेच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. बॅंकेत जो काही भ्रष्टाचार झाला, त्याचा फटका रावत यांना या निवडणुकीत बसणार असल्याचेही राजू कुकडे यांनी म्हटले आहे. 

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत व संचालकांनी बॅंकेतील नोकर भरती करताना शासन निर्णय डावलला. मागासवर्गीय ओबीसी, एससी, एसटी, एनटी यांचे आरक्षण संपवले व ओपनमधील जागा पैसे घेऊन भरण्याचं कारस्थान त्यांनी चालवलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या नोकर भरती विरोधात जोरदार विरोध करून शासन, प्रशासनाकडे तक्रारी दिल्या. ऐन विधानसभा निवडणुकीच्या आचारसहिंता काळात नोकर भरती बेकायदेशीरपणे सुरु असल्याने ही भरती रद्द करण्याची मागणी मनसेने केली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी सदर नोकर भरतीला तात्पुरती स्थगिती दिली. परंतु या नोकर भरतीत ओबीसी, एससी, एसटी, एनटी प्रवर्गाला आरक्षण द्या. अन्यथा यापुढे मनसेकडून आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या मुख्य शाखा असलेल्या चंद्रपूर येथे मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात व वरोरा येथील बॅंकेच्या शाखेसमोर वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष सुधीर खापणे यांच्या नेतृत्वात निदर्शने आंदोलन करण्यात आले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या अध्यक्ष आणि संचालकांनी सरकारचे विधी व न्याय विभागाचे अभिमतांवर बॅंकेतील नोकर भरतीत मागासवर्गीयांचे आरक्षण संपवल आहे. जे नियमबाह्य आणि तमाम ओबीसी, एससी, एसटी आणि विमुक्त भटक्या जमाती यावर अन्याय करणारे आहे. दरम्यान उच्च न्यायालयात ज्या टिसीएस कंपनीला नोकर भरतीचे काम देण्याचे अभिवचन देण्यात आले, ते न पाळता स्वतः निर्णय घेतला व आयटीआय कंपनीसोबत संगनमत करून सगळ्या जागा लाखों रुपये घेऊन भरण्याचं काम केलं.

Akola West : महायुतीमधील धनुष्यबाणाचे शेगडीला बळ

गोरगरिबांचे नुकसान

गोरगरीब हुशार मुलांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली. त्यांना इथे संधी मिळणार नसल्याने ही भरती प्रक्रिया रद्द करण्यासाठी व नव्याने आरक्षण लागू करून नोकर भरती घेण्यासाठी मनसेकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येऊन घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात मनसे वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष सुधीर खापने, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, जिल्हा उपाध्यक्ष विजय तूरक्याल, शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष मोहित हिवरकर, तालुका उपाध्यक्ष किशोर धोटे, विभाग अध्यक्ष प्रमोद हनवते, उत्तम चिंचोलकर, भदुजी गिरसावळे, बाळू गेडाम, प्रतीक मुळे, स्वप्नील देव सहभागी झाले होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!