प्रशासन

Buldhana : बुलढाण्यात कॅन्सरचा धोका वाढविणाऱ्या कागदी कपांवर बंदी

Cancer : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; मात्र यंत्रणेकडून अंमलबजावणी शून्य..

Paper cup :  कॅन्सरसारख्या भयंकर आजारांना निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरणाऱ्या चहा पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी कपांवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी 7 नोव्हेंबर रोजी दिले.. मात्र अद्यापही या आदेशाची संबंधित यंत्रणांच्या विभागप्रमुखांकडून कुठेच अंमलबजावणी झालेली नाही..तर दुसरीकडे मात्र चहाच्या अनेक दुकानांवर सर्रास कागदी कपांचा वापर होताना दिसत आहे..

बीपीए या केमिकलचा वापर करून चहाचे कागदी कप बनविले जातात. कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रो प्लास्टिक वितळते आणि चहासोबत लाखो मायक्रो प्लास्टिक कण पोटात जातात..यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागू शकते. त्यासाठी कागदी कपांवर बंदी घालण्याची मागणी आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सतीशचंद्र रोठे यांनी ऑक्टोबर महिन्यात जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्याकडे केली होती.. त्याची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी कागदी कपांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदारांनी 7 नोव्हेंबर रोजी सर्व विभागप्रमुखांना कागदी कपांवर बंदी घालण्याचे आदेश निर्गमित करून कार्यवाही करण्याबाबतचे पत्र दिले आहे.. तक्रारकर्ते रोठे यांनाच तब्बल महिनाभरानंतर बंदीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे आदेशाचे यंत्रणांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून अशा आहेत सूचना 

चहाचे कागदी कप बनवितांना त्यामध्ये बीपीए नामक केमिकल चा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. सदर कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रो प्लास्टिक वितळते आणि चहा घेतल्याने लाखो मायक्रो प्लॉस्टीकचे कण पोटात जातात ज्यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत असल्यामुळे चहाच्या कागदी कपांवर बंदी घालण्याबाबत जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या संदर्भिय पत्रात नमुद केले आहे.

Buldhana : पण फडणवीसांच्या मनात होते ॲड.आकाश फुंडकर! 

संदर्भिय अर्जाची प्रत पुढील कार्यवाहीकरिता यासोबत सहपत्रित करण्यात येत आहे. त्यानुसार संदर्भिय अर्जात नमुद मुद्यांचे अनुषंगाने नियमाप्रमाणे उचित कार्यवाहीबाबत आपल्या अधिनस्त असलेलें सर्व शासकीय कार्यालये, विद्यालये, महाविद्यालये, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, सार्वजनिक संस्था ई. कार्यालयांना आपले स्तरावरून कळविण्यात यावे व केलेल्या कार्यवाहीबाबत या कार्यालयास व संबंधित अर्जदारास कळविण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी दिले आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!