महाराष्ट्र

Lok Sabha Election : 50 टक्के मतदान केंद्रांवर होणार चित्रीकरण !

Eye on Centers : वेबकास्टिंग द्वारे थेट जिल्हाधिकारी ठेवणार केंद्रावर नजर

Loksabha Election : रावेर लोकसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रांपैकी 50 टक्के मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण (वेब कास्टिंग) केले जाणार आहे. मतदान प्रक्रियेत पारदर्शकता तसेच मतदान केंद्रावरील नियंत्रित करण्यासाठी लाभ होणार आहे.

रावेर मतदारसंघामध्ये जळगाव जिल्ह्यामधील 5 व बुलढाणा जिल्ह्यामधील 1 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. हा मतदारसंघ 2008 साली निर्माण करण्यात आला. आतापर्यंत केवळ संवेदनशील आणि अति संवेदनशील मतदान केंद्रावर छायाचित्रण केले जात होते. मात्र यंदा रावेर लोकसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्राच्या 50 टक्के मतदान केंद्राचे छायाचित्रण केले जाणार आहे.

मतदानापूर्वी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून घरोघरी मतदान चिट्टीचे (वोटर स्लीप) वाटप करण्यात येते. या प्रक्रियेत मयत झालेेले किंवा पत्त्यावर राहत नसलेले मतदार निदर्शनास येतात. त्यामुळे अशा घरांमध्ये मतदान चिट्टीचे वाटप केले जात नाही. अशा मतदारांची स्वतंत्र यादी तयार करण्यात येते, असे मतदार ज्या ठिकाणी जास्त असतील त्या मतदान केंद्रावर चित्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय पाचपेक्षा जास्त खोल्या असणारी मतदान केंद्रे गेल्या काही सार्वत्रिक लोकसभा, विधानसभा निवडणुकांत रांगा लागणारी मतदान केंद्रे किंवा सायंकाळनंतर मतदानासाठी रांगा लागणार्‍या मतदान केंद्रावर देखील चित्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हे चित्रीकरण पाहण्याची सुविधा केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त, महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी ताठ जिल्हाधिकारी यांना असणार आहे.

एका लोकसभेसाठी मतदान यंत्रात (बॅलेट युनिट) 15 उमेदवारांचे व एक ‘नोटा’, असे 16 बटन असतात. रावेर मतदारसंघात 29 उमेदवार रिंगणात होते. त्यातील पाच उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे रिंगणात 24 उमेदवार आहे. 15 पेक्षा अधिक उमेदवार झाल्याने रावेर मतदारसंघात दोन मतदान यंत्र (बीयू) लागतील.

Lok Sabha Election 2024 : मतदारांच्या मदतीला निवडणूक आयोगाचे ‘ॲप्स’

राज्यात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत संवेदनशील मतदान केंद्रांवर व्हिडीओ चित्रीकरण करण्याचा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आला होता. त्याचाच पुढचा भाग म्हणून 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत राज्यातील 50 टक्के मतदान केंद्रांवर व्हिडीओ चित्रीकरण करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्यात ९७ हजार मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी 50 टक्के मतदान केंद्रे म्हणजे सुमारे 50 हजार केंद्रांवर चित्रीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांचाही समावेश आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!