महाराष्ट्र

Lok Sabha Election : ‘अबकी बार 70 टक्के पार’

Buldhana Constituency : निवडणूक पाठशाळेतून मतदारांमध्ये जनजागृती

Administration in action : निवडणुकांमध्ये मतदानाच्या कमी टक्केवारीवरून काथ्याकूट होत आहे. तरी ‘अबकी बार 70 टक्के पार’ अशी भूमिका घेऊन प्रशासनाने बुलढाणा जिल्ह्यातील 20 लाख मतदारांमध्ये जाणीव जागृतीचा संदेश निवडणूक पाठशाळेच्या माध्यमातून दिला आहे. त्यामुळे राज्यात हा उपक्रम नावीन्यपूर्ण ठरला आहे. 

प्रत्येक कुटुंबातील किमान एक मूल शाळेमध्ये आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सुमारे 5 लाख कुटुंबातील 20 लाख मतदारांपर्यंत चुनाव पाठशाळेच्या माध्यमातून प्रशासनाने पोहोचत मतदानाचा टक्का वाढविण्यावर जोर दिला आहे. एकूण पाच दिवस हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला.

बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येक निवडणुकीत 70 टक्केवर मतदान झाले नाही. प्रशासनाने कितीही आटापिटा केला तरी हि मजल मारता आली नाही यासाठी आता बुलढाणा लोकसभा मतदार संघात 26 एप्रिल रोजी पार पडणाऱ्या मतदानात ‘अबकी बार 70 टक्के पार’ चा नारा प्रशासनाने दिला आहे. त्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहे. यावेलीयेस च्या निवडणुकीत नव्याने मतदार म्हणून समाविष्ट झालेल्या मतदारांना टार्गेट केल्या जात आहे. शालेय विद्यार्थी हा 18 वर्ष पूर्ण झाले की मतदार म्हणून आपला मतदानाचा हक्क प्रथमच बजावतो. अशा वेळी मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेसाठी नेमकी कशी व्यवस्था असते, त्याविषयीचे समाजमाध्यमातून ऐकलेल्या किंवा वाचलेल्या गोष्टी त्याच्या मनात कुतूहलासोबतच प्रसंगी गोंधळही निर्माण करत असतात. त्यानुषंगाने शालेय स्तरावरच त्याचे समाधान व्हावे तसेच शाळा, महाविद्यालय स्तरावर मतदान केंद्र व तेथे होणाऱ्या कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांना अभिरूप मतदान केंद्र स्थापत मतदान प्रक्रिया नाट्य पद्धतीने अभिरूप स्वरूपात समजावून सांगण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानल्या जात आहे.

प्रशासन यावेळेस शांततापूर्ण, भयमुक्त व पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया कशी पार पडेल व त्यातून लोकशाही कशी बळकट होते. यावरचा विश्वास अधिक दृढ करण्यास प्राधान्य देण्यात आले. यासोबतच कुटुंबात शाळेत झालेली प्रत्येक गोष्ट मूल अनौपचारिक गप्पांमध्ये सांगते. त्यातून कुटुंबामध्येही मतदानासंदर्भात चर्चा होते. मुलाच्या बोलण्यास कुटुंबही प्रतिसाद देते. ही सकारात्मक संकल्पना दृष्टिक्षेपात ठेवत जिल्ह्यातील 5 लाख 10 हजार विद्यार्थ्यांमार्फत प्रशासन साडेचार लाख कुटुंबातील 20 लाख 40 हजार 652 मतदारांपर्यंत थेट मतदार जाणीव जागृतीचा संदेश पोहोचविण्यात यशस्वी झाले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

पाच दिवस राबविला उपक्रम

‘सुनियोजित मतदार शिक्षण व निवडणूक सहभाग’ मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नोडल तथा जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांच्या संकल्पनेतून 26 एप्रिल ते मे एप्रिल या कालावधीत या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली.

AAP Vs BJP : जेपी नड्डांवर आम आदमी पार्टीचा हल्लाबोल

जिल्ह्यातील शाळांमध्ये असा राबविला उपक्रम

पहिल्या दिवशी संबंधित शाळांमधील मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी प्रार्थनेनंतर विद्यार्थ्यांना एकत्रितरीत्या समृद्ध व गौरवशाली लोकशाहीसंदर्भात माहिती देत निवडणूक प्रक्रियेसंदर्भात सांगितले. निवडणूक प्रकियेत मतदारांची महत्त्वपूर्ण भूमिका हा मुद्दाही समजावून सांगितला. कुटुंबामध्ये त्याबाबत जागृती व्हावी, या उद्देशाने नागरिकशास्त्राच्या अनुषंगाने त्यांचे ज्ञानसंवर्धन केले. त्यासाठी मतदान केंद्रस्तरावर स्थापित मतदान जाणीवजागृती गटाचीही मदत घेण्यात आली. यासोबतच विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांचे, कुतूहलाचे विद्यार्थी संवाद कार्यक्रमाद्वारे समाधान करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार मतदार जागृतीविषयक घोषवाक्य घेऊन स्पर्धा घेण्यात आल्या. त्यानंतर मतदानाचे महत्त्व पटविणारे पत्रलेखन करण्यास मुलांना प्रोत्साहित करत ते कुटुंबातील मतदानाचा अधिकार प्राप्त व्यक्तीच्या अवलोकनास आणून देण्यात आले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!