महाराष्ट्र

Lok Sabha Election : मतदार स्लिप घरोघरी पोहचवताना वाहतात घामाच्या धारा

Voting Slip Distribution : मतदार चिठ्ठय़ा घरोघरी पोहोचविण्याचे प्रशासनापुढे आव्हान

Raver Constituency : कमी वेळात मतदार चिठ्ठ्या पोहोचवाव्या लागत आहेत. जळगाव जिल्ह्य़ातील 6 आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात घरोघरी मतदार चिठ्ठय़ा पोहोचवण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे. मात्र,100 टक्के चिठ्ठय़ा पोहोचविण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. सर्वत्र चिठ्ठय़ा न पोहोचल्यास मतदान केंद्रामध्ये बुथ लेव्हल ऑफिसर मतदार चिठ्ठय़ा उपलब्ध करून देणार आहेत. 

प्रशासनही 100 टक्के मतदानासाठी परिश्रम घेत आहे. मतदानाचा दिवस जवळ आल्याने स्लिप घरोघरी पोहोचविल्या जात आहे. उन्हात फिरताना कर्मचाऱ्यांना घाम फुटत आहे. विशेष म्हणजे राजकीय पक्षांच्या किंवा उमेदवारांच्या स्लिप अद्याप घरोघरी पोहोचलेल्या नाहीत. प्रशासनाने वेगवान मोहीम सुरू केली असून, कर्मचारी स्लिपचे गठ्ठे घेऊन फिरताना दिसत आहेत. मतदानाच्या दोन दिवस आधी स्लिप मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवकांकडे जबाबदारी सोपविली आहे, तर शहरी भागांत बीएलओ व अन्य निवडणूक कर्मचाऱ्यांवर जबाबदारी आहे.

उन्हात भटकंती करावी लागत असल्याने कर्मचारी हैराण झाले आहेत. महापालिका क्षेत्रात मतदारांना गाठताना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक मतदार दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे आढळले आहे. त्यांनी रोजगारासाठी गाव सोडले आहे, मात्र मतदार म्हणून गावातच नोंद कायम आहे. भाडोत्री कुटुंबांनीही घरे बदलली असून, त्यांना शोधताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. काही ठिकाणी पत्ता सापडला, तरी घर बंद असल्याने कर्मचाऱ्यांची अडचण होत आहे. परंतू आदेश असल्याने कर्मचारी हे घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Lok Sabha Election- : साहेब मृतांची नावे आहेत, मात्र आमची नाहीत?

वर्णमालेनुसार नावे नसल्याने हेलपाटे

यादी वर्णमालेनुसार तयार केलेली नसल्याने कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे आडनावानुसार नोंदवली असती, तर यादीमध्ये एकत्रित आली असती. पण पहिल्या नावाने यादी बनविल्याने एकाच कुटुंबातील सदस्य चार-पाच याद्यांमध्ये विखुरले गेले आहेत. कर्मचाऱ्यांना एकाच कुटुंबाकडे चार-चार वेळा जावे लागत आहे.

ळगाव लोकसभा जागेसाठी नवीनतम सीमांकन 

जळगाव लोकसभा जागेसाठी नवीनतम सीमांकन झाले आहे. दस्तऐवजानुसार, या मतदारसंघात खालील क्षेत्रांचा समावेश आहे. जळगाव शहर, जळगाव तहसील, जळगाव महापालिका, जळगाव ग्रामीणमध्ये जळगाव तहसील (भाग), महसूल मंडळ कानळदे, असोदा, जळगाव, नशिराबाद आणि म्हसावद, धरणगाव तहसील,अमळनेर तहसील, पारोळा तहसील (भाग), महसूल मंडळ बहादरपूर आणि शेळवे, एरंडोल तहसील.

पारोळा तहसील (भाग), महसूल मंडळ चोरवड, तामसवाडी, पारोळा आणि पारोळा नगर परिषद, भडगाव तहसील (भाग), महसूल मंडळ आमदाडे.

चाळीसगाव तहसील, पाचोरा तहसील (महसूल मंडळ कुऱ्हाड वगळून), भडगाव तहसील (भाग), महसूल मंडळ – कोळगाव, भडगाव आणि गोंडेगाव.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!