महाराष्ट्र

Lok Sabha Election : रामटेकच्या गडावर बंडखोरीची तोफ सज्ज

Uddhav Thackeray : उमेदवाराच्या नावाचा तिढा सुटता सुटेना

 

Ramtek Constituency : पूर्व विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवार ठरवण्यावरून चर्चेत आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवाराचा तिढा सुटता सुटेनासा झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पूर्व विदर्भ संघटनप्रमुख सुरेख साखरे आता रामटेकच्या गडावरून बंडखोरीची तोफ डागण्याच्या तयारीत आहेत.

रामटेक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा मतदारसंघ आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात साखरे नाराज आहेत. अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. या मतदारसंघातून विद्यमान खासदार कृपाल तुमाने हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काम करीत आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर पहिला हक्क शिवसेनेचा आहे. उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळ-वाशीम दौऱ्यात कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. रामटेकमधील राजकीय परिस्थिती ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आली. ठाकरे यांनी सर्व धीरगंभीपणे ऐकून घेतले. मात्र वाटाघाटीत महाविकास आघाडीतील काँग्रेससाठी हा मतदारसंघ सोडला. त्यामुळे शिवसैनिक नाराज झाले आहेत.

पूर्वी बहुजन समाज पार्टीत असलेले प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे पाच वर्षांपूर्वी ते शिवसेनेत दाखल झालेत. त्यांनी बसपात असताना निवडणुकही लढविली आहे. साखरे यांनी रामटेकमध्ये संघटन बांधणी केली. शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह भरला. हा प्रतिसाद बघूनच त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. अशात त्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. आता उद्धव ठाकरे यांचा फोन आला तरच माघार अन्यथा बंडखोरीची तोफ डागणार असे सुरेश साखरे यांनी ठरविले आहे.

 

 

 

 

 

 

error: Content is protected !!