महाराष्ट्र

NCP Politics : गणेश मंडळात शरद पवार गटाच्या नेत्याची शिवीगाळ 

Nagpur Police : वादामुळे बाप्पाला लवकरच निरोप 

Dispute In Festival : चैतन्य आणि मांगल्य घेऊन येणाऱ्या, विघ्नहर्त्याच्या रूपाने येऊन सकारात्मकता पेरणाऱ्या गणरायांचा उत्सव शनिवारपासून (ता. 7) सुरू झाला . नागपूरसह राज्यभरातील भक्त गणेशाच्या नामरंगात न्हाऊन निघाले. सर्वत्र मोरयाचाच जयघोष चालला आहे. गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांतील भव्य गणेश मूर्ती आणि तेथील देखावे येणाऱ्या भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. अशात नागपूर येथील एक गणेशोत्सव मंडळ सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. जरीपटका येथील रुद्र गणेश उस्तव मंडळाने बसवलेली गणेश मूर्ती भाविकांच्या आक्षेपानंतर मंडळाला तातडीने विसर्जित करावी लागली आहे. यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणात राजकीय पक्षानेही प्रवेश केला आहे.

उपराजधानी नागपुरात प्रत्येक उत्सव मोठ्या आनंदात साजरा होतो. त्याच प्रकारे गणेशोत्सवाची धूम असते. घरी आणि मंडळात देखील गणपती विराजमान होतात. मंडळात दहा दिवस गणपतीची आराधना केली जाते. परंतु नागपुरात दहा दिवसात अगोदर जरीपटका येथील मंडळातील गणपतीला निरोप द्यावा लागला.

नेमका प्रकार काय?

जरीपटका येथील रुद्र गणेश उस्तव मंडळाने बसवलेल्या गणेश मूर्तितून पंचमहाभूते (पृथ्वी, जल, अग्नि, वायु व आकाश) दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गणरायाच्या सोंडेकरीता ड्रेनेज पाइप वापरल्याचे काहींच्या निदर्शनास आले. त्यामुळे भावना दुखावल्याने लोकांनी थेट राजकीय पक्षाकडे तक्रार केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते वेदप्रकाश आर्य मंडळात पोहोचले. मंडळाला मूर्तिचे त्वरीत विसर्जन करण्यास सांगितले. वेदप्रकाश आर्य यांनी मंडळांत जाऊन गोंधळ घातला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाने शिवीगाळ केली. देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखविण्याचा ते तयारीत होते. सर्व प्रकरण पाहून जरीपटका पोलिसांनी त्यांना अटक केली.

दिशाभूल

जरीपटका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक निकेतन कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते वेदप्रकाश आर्य यांच्यापर्यंत रुद्र गणेश उस्तव मंडळात गणरायाच्या सोंडेकरीता ड्रेनेज पाइप वापरण्यात आली, अशी महिती पोहोचविण्यात आली. परंतु ही एकप्रकारे दिशाभूल होती. वेदप्रकाश आर्य यांनी कोणत्याही गोष्टीची पडताळणी न करता गोंधळ घातला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सुद्धा अपशब्द वापरले. त्यामुळे पोलिसांनी योग्य कारवाई करत वेदप्रकाश आर्य यांना ताब्यात घेतले.

याप्रकरणी आर्य यांना आता जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (JMFC) एस. एम. बिरहरी-जगताप यांनी याप्रकरणी सुनावणीत आर्य यांना जामीन मंजूर केला. जरीपटका येथील रुद्र गणेश उस्तव मंडळाने भावना दुखावल्याप्रकरणी माफी मागत गणेश मूर्तीचे (ता.12) सप्टेंबर रोजी विसर्जन केले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!