महाराष्ट्र

Anil Dhanorkar : बाळू धानोरकर यांच्या भावाच्या डोळ्यांतून फुटला अश्रूंचा बांध 

Dispute In Family : भाऊ जगातून जाताच एकाकी पडले अनिल धानोरकर 

Congress Politics : नवख्यांना डोक्यावर घ्या आणि जुन्या जाणत्या प्रामाणिक लोकांना लाथा मारा, असा प्रकार सध्या चंद्रपूरच्या काँग्रेसमध्ये सुरू आहे. याच प्रकारातून डॉ. विजय देवतळे यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. आपला गुन्हा तरी सांगा, अशी आर्त हाक देणाऱ्या देवतळे यांचा आक्रोश कायम असताना आता काँग्रेसमधील आणखी एका नेत्याच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला आहे. 

कटकरस्थान का

दिवंगत माजी खासदार बाळू धानोरकर यांच्या सख्ख्या मोठ्या भावावर ही वेळ आली आहे. अनिल धानोरकर यांच्या विरोधात त्यांच्याच कुटुंबातून कटकारस्थान सुरू झाले आहे. बाळू धानोरकर हयात असताना धानोरकर बंधुनी चंद्रपुरातील राजकारणात बरेच नाव कमावले. बाळू धानोरकर यांनी आपल्या वडील बंधूंना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पदही मिळवून दिले होते. मात्र काळाला धानोरकर बंधूंचे सख्य पहावले नाही. भाऊ बाळू यांचे निधन झाले.

बाजूला काढण्यात आले

धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांनी अनिल धानोरकर यांना कुटुंबातून खड्यासारखे बाजूला काढले. अलीकडेच अनिल धानोरकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी, ही इच्छा व्यक्त केली. बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपुरात कोणताही विकास न करता लोकसभा निवडणुकीत आश्चर्यकारकरीत्या विजय मिळवला आहे. बाळू धानोरकर यांची ती पुण्याई असल्याचे काँग्रेस कार्यकर्ते सांगतात.

Chandrapur Congress : खासदार धानोकर यांच्या घरातच सुंदोपसुंदी

उत्तराधिकारी शोधला..

खासदार होताच प्रतिभा धानोरकर यांनी भद्रावती – वरोरा विधानसभा मतदारसंघाचा उत्तराधिकारीही शोधला आहे. आपल्या सख्या भावासाठी खासदार प्रतिभा धानोरकर या वाटेत येणारा प्रत्येक काटा बाजूला करत चालल्या आहेत. अशातच त्यांनी आपल्या भावाच्या राजकीय मार्गात आडवे येऊ पाहणाऱ्या अनिल धानोरकर यांनाही सोडलेले नाही.

दादाची आठवण

आपल्याच कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेल्या या वागणुकीमुळे आता अनिल धानोरकर यांचे काळीज पिळवटले आहे. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या वागणुकीमुळे काळजाला पडलेल्या पिळीच्या वेदना अनिल धानोरकर यांच्या डोळ्यातून अश्रू रूपाने वाहिल्या. या संदर्भात बोलताना अनिल धानोरकर यांनी रामायणातील बंधू प्रेमाचा दाखला दिला. यात रावण प्रभू श्रीरामाला म्हणतो की, माझ्यासोबत माझा भाऊ नव्हता म्हणून मी युद्धात पराभूत झालो. लक्ष्मणाला बाण लागल्यानंतर श्रीरामाचा जीव कासावीस झाला. अगदी तशाच वेदना होत असल्याची प्रचिती अनिल धानोरकर यांच्या डोळ्यातून होणाऱ्या अश्रूंमधून आली.

भैय्या ये दिवार टुटती क्यू नही..

राजकारण आणि सत्तेची हाव नात्यांमध्ये किती दुरावा आणू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. सगळं काही आपल्यालाच मिळावं. आपल्या वाट्याचे जे आहे, ते तर आपले आहेच. परंतु दुसऱ्याच्या वाट्याचेही आपल्यालाच मिळावे, अशी मानवी प्रवृत्ती अलीकडच्या काळात बघायला मिळत आहे. त्यातूनच एकाच घरातील नात्यांमध्ये अशा भिंती उभ्या राहतात की, भावाला आपल्याच दिवंगत भावाच्या प्रतिमेसमोर उभे राहून विचारावं लागतंय की, ‘भैय्या ये दिवार टुटती क्यू नही..

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!