महाराष्ट्र

MLA Nitin Deshmukh : शिवसेनेमुळे काँग्रेस एकाची तेरावर गेली

Shiv Sena : काँग्रेसकडून प्रत्युत्तर, शिवसेना फक्त नऊ जिंकली

Tug Of War : महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. शिवसेना काँग्रेससोबत होती म्हणून एकचे तेरा झाले. आमदार देशमुख यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आमदार नितिन देशमुख यांनी आपली चूक दुरुस्ती करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश तायडे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

आरोप- प्रत्यारोप

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या (Mahayuti) तुलनेत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाले. महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षानी एकत्र निवडणूक लढवत महायुतीची पिछेहाट केली. या निवडणुकीत राज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरला. 13 जागा काँग्रेसला जिंकता आल्या. अकोल्यात यावरूनच आता काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

बाप्पुंची देशमुखी

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी काँग्रेसबाबत केलेलं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आले आहे. माध्यमातून बोलताना आमदार नितीन देशमुख यांनी हे वक्तव्य केले. महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेमुळे राज्यात काँग्रेसच्या एका जागेच्या तेरा जागा झाल्या, असा दावा आमदार देशमुख यांनी केला आहे. दुसरीकडे यावरून काँग्रेसनेही आमदार देशमुख यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आमदार नितीन देशमुख हे बाळापूर मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत.

आमदार नितीन देशमुख यांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतही महायुतीप्रमाणे काही नेत्यांमधील आरोप- प्रत्यारोप चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. आमदार नितीन देशमुख यांनी शिवसेना महाविकास आघाडीत सरस असल्याचे मत व्यक्त केले. शिवसेनेमुळेच काँग्रेस एका खासदारांवरून 13 खासदारांवर गेली. आम्ही काँग्रेसचे एकचे तेरा केले. ही शिवसेनेत ताकद असल्याचं आमदार देशमुख म्हणाले. भाजप 23 खासदारांवरुन नऊ खासदारांवर आल्याचंही नितिन देशमुख यांनी नमूद केलं.

आमदार देशमुख यांनी केलेल्या या वक्तव्यावरून काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. दोन्ही पक्षाचा ‘स्ट्राइक रेट’ आमदार देशमुख यांनी पाहावा, असं काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी प्रकाश तायडे म्हणाले. लोकसभेत महाविकास आघाडीमुळे काँग्रेस हा एक नंबरचा पक्ष झाला. एवढी ताकद महाविकास आघाडीत आहे.

MLA Nitin Deshmukh : देशमुखांचा इशारा ठरला परिणामकारक, विखे पाटील येणार !

परिवर्तन हवे

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 17 जागा लढवित 13 जागा जिंकल्या. शिवसेनेने 23 जागा लढवून नऊ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी ही काळाची गरज असल्याचे तायडे यांनी म्हटलं. कुणी जर असं म्हणत असेल, खासकरून आमदार नितीन देशमुख की शिवसेनेच्या भरवश्यावर काँग्रेसचे तेरा खासदार झाले ही चूक त्यांनी दुरुस्त करावी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्वात काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली. अद्यापही काँग्रेस राज्यात अव्वलच आहे. विधानसभा निवडणुकीत लोकांना परिवर्तन हवे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीलाच यश मिळेल, असा विश्वासही प्रकाश तायडे यांनी व्यक्त केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!