Political News : बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा नणंद सुप्रिया सुळे विरुद्ध वहिनी सुनेत्रा पवार असा सामना रंगला. आणि यात नणंद सुप्रिया सुळे ह्या मोठ्या फरकाने विजयी झाल्या. वाहिनी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड करण्यात आली. यानंतर आता बारामती आणि पुणे शहरात ‘हारकर जितने वाले को बाजीगर कहते है…’ भावी केंद्रीय मंत्री अश्या आशयाचे बॅनर झळकत आहेत. सुनेत्रा पवार यांच्या बॅनरच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
देशात सर्वाधिक लक्षवेधी बारामती लोकसभा मतदार संघातील लढत ठरली होती. पवार कुटुंबातच ही लढत होती. एकीकडे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे होत्या. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार होत्या. या लढतीत सुप्रिया सुळे यांनीच बाजी मारली. सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेवर पाठवले. त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे सर्वत्र सुनेत्रा पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले आहे.
पुण्यात झळकले बॅनर..
रिपाइंच्या सचिन खरात गटातर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल बॅनर लावले आहे.
यामध्ये पुण्यातील असलेल्या कात्रज चौकामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे लावलेल्या बॅनरची चर्चा रंगली आहे. “हारकर जितने वाले को बाजीगर कहते है”, असे वाक्य लिहून सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. यामुळे रिपाइंने कोणावर निशाणा साधला आहे, त्यावर राजकीय चर्चा सुरु झाली आहे. तर बारामतीमध्ये अनेक ठिकाणी भावी केंद्रीय मंत्रीअसे बॅनर लावण्यात आले आहे
BJP : झोपी गेलेले अण्णा जागे झाले अन् दादांच्या मागे लागले !
सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, बारामतीत लोकसभा मतदारसंघात फिरत असताना मला अनेक समस्या जाणवल्या आहेत. त्या सोडवण्यास आता प्राधान्य देणार आहे. केंद्रीय मंत्रीपदाच्या प्रश्नावर सुनेत्रा पवार यांनी थेट उत्तर दिले. संधी मिळाली तर त्याचे सोने करणार, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेतील पराभवावर बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, जनतेचा कौल मला मान्य आहे. आम्ही आत्मपरीक्षण करत आहोत. पराभवाच्या कारणांवर विचार मंथन करत आहोत. काय घडले त्याचा विचार करून पुढची वाटचाल करू, असे त्या म्हणाल्या.