Gadchiroli Politics : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघातून निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवार भाग्यश्री आत्राम यांच्या पतीची खळबळजनक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या संभाषणात भाग्यश्री यांचे पती ऋतुराज हलगेकर हे नक्षली खंडणी, गुटख्याची तस्करी आणि गर्लफ्रेंड असल्याबाबत बोलत असल्याचे ऐकू येते. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये दोन व्यक्ती संभाषण हिंदी मध्ये करत असल्याचं ऐकू येते. भाग्यश्री आश्रम यांचे पती बोलताना सांगतात, त्यांना इलेक्शनच्या वेळी महिन्याचे 30 ते 35 लाख येतात. देवाच्या कृपेने गुन्हेगारीची सर्व संकटं टळली. खंडणीचे देखील 25 लाख घरी येतात. माझी गर्लफ्रेंड आलापल्ली येथे आहे, असे संभाषणाच्या वेळी ऋतुराज हलगेकर बोलत असल्याचा दावा केल जात आहे.
गुटख्याचा व्यवसाय
बेकायदा गुटख्याच्या व्यवसायात मोठी गुंतवणूक असल्याचे ते बोलताना ऐकू येतं. आश्चर्याची बाब म्हणजे नागपूरचा उल्लेख करत गुटखा व्यवसायात 13 लाखांची गुंतवणूक असल्याचेही ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला येतं. त्यातून पैसे मिळतो. ॲाडिओ क्लिपमध्ये ऋतूराज हलगेकर यांची नक्षल खंडणी, विवाहबाह्य संबंध, अवैध गुटखा व्यवसायांची त्यांनी दिली कबुली दिल्याचं सिद्ध होत आहे.
सध्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे. अशा परिस्थितीत भाग्यश्री यांच्या पतीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने चर्चेला पेव फुटले आहेत. ‘द लोकहित’ व्हायरल झालेली ही ऑडिओ क्लिप सत्य किंवा असत्य याबाबत कोणताही दावा करीत नाही. गडचीरोली पोलिस या ऑडिओ क्लिपनंतर ऋतूराज हलगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करू शकतात, असं सांगण्यात येत आहे.
Nitin Raut : स्वतःच्याच सरकारने ‘फ्यूज’ उडवल्यानंतरही मतांचा जोगवा
बाप विरुद्ध लेक
गडचिरोली जिल्ह्यातला अहेरी हा मतदारसंघ आत्राम राजघराण्याचा पारंपारिक मतदार संघ आहे. दक्षिण गडचिरोलीतल्या आदिवासी मतदारांवर प्रभाव असलेल्या या आत्राम राजघराण्यातील एक नवी लढत मतदारांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बाप-लेकीची राज्यातली ही पहिली लढत असल्याचं बोललं जात आहे. आत्राम यांच्या घरातील फुटीमुळे राजकीय वातावरण तापलं असताना पहिल्यांदाच मुलगी विरुद्ध वडील असा राजकीय संघर्ष पेटला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आत्राम राजघराण्यात राजकीय वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे. मंत्री धर्मरावबाबा आत्राम लोकसभेकरीता इच्छुक होते. परंतु ऐनवेळेवर त्यांना उमेदवारी मिळाली नाही. यामुळे त्यांनी विधानसभेकडे लक्ष केंद्रीत केले. मात्र त्यांची मोठी मुलगी भाग्यश्री आत्राम, जावई ऋतुराज हलगेकर हे देखील विधानसभेसाठी इच्छुक असल्याने घरातच सत्ता संघर्षाला सुरुवात झाली.
आजपर्यंत धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली मोठे झालेले मुलगी आणि जावई आता त्यांनाच आव्हान देत आहेत. अशातच भाग्यश्री यात्रा यांच्या पतीची अशी व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कोणता परिणाम होतो? याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे. या ऑडिओ क्लिपवरून कोणती कारवाई होते, हे देखील महत्त्वाचे आहे.