Balasaheb Thackeray : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आगळेवेगळे पोट्रेट साकारण्यात आले आहे. हे पोट्रेट 27 हजार हिऱ्यांनी साकारलेले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री येथे त्यांना हे पोट्रेट शिवसैनिकांकडून भेट देण्यात आले. शिवसेना प्रवक्ते आणि जनसंपर्क प्रमुख अॅड. हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून हे पोट्रेट साकारण्यात आले आहे. शैलेश आचरेकर यांनी ही कलाकृती साकारली आहे. शैलेश आचरेकर यांनी आपल्या केलेमुळे अनेक पुरस्कार पटकावले आहेत.
शैलेशने यांनी हिऱ्यांनी साकारलेले बाळासाहेब पोट्रेट मनमोहक आहे. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात ते नक्कीच प्रमुख आकर्षण ठरेल, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. झगमगत्या हिऱ्यांनी साकारलेले हे पोट्रेट तयार करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला. शैलेश आचरेकर यांनी अतिशय बारकाईन यावर काम केले. यापूर्वी त्यांनी रतन टाटा यांचे पोर्ट्रेट तयार केले होते. उद्धव ठाकरे यांनी पोट्रेट पाहताच ते आकर्षक असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी पोर्ट्रेट पाहताच ‘अरे वा सुंदर’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. मातोश्री येथे या सोहळ्याप्रसंगी शिवसेना खासदार संजय राऊत, विनायक राऊत, उपनेते नितीन नांदगावकर, हिंगोली-नांदेडचे संपर्क प्रमुख बबन थोरात, रवी म्हात्रे आदी उपस्थित होते.
सरकारवर टीका
मिंधेच्या कारखान्यांवर कर्जांची उधळण केली जाते. विरोधकांच्या कारखान्यांचे कर्ज प्रस्ताव मात्र कचऱ्यात टाकले जातात असा हल्ला ठाकरे गटाने मुखपत्रातून चढवला. अर्थकारणात राजकारणाला स्थान असता कामा नये. मात्र प्रत्येक क्षेत्रात चोवीस तास केवळ राजकीय घाण चिवडत बसलेल्या निलाजऱ्यांना हे सांगून काय उपयोग. देशातील आजवरचे सर्वात पक्षपाती बजेट, अशी या अर्थसंकल्पावर टीका होत असतानाच महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या कर्जाबाबतही सरकारने असेच पक्षपाती धोरण स्वीकारले आहे. जे साखर कारखाने सरकारच्या दावणीला बांधले गेले आहेत, त्यांनाच फक्त कोटय़वधी रुपयांची कर्जे मंजूर करण्यात आली आहेत, असे लेखात आहे.
ज्या कारखान्यांच्या अध्यक्ष व संचालक मंडळाने सत्तारूढ पक्षाचे बूट चाटायला नकार दिला, त्या साखर कारखान्यांचे कर्ज प्रस्ताव फेटाळून लावण्यात आले. जो कारखाना अधिक ‘मिंधेगिरी’ करेल, त्याला अधिक कर्ज, अशीच ही योजना दिसते. कर्जांसारख्या आर्थिक विषयात अशी मनमानी व दंडेली करणे ही मोगलाईच आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी मदत केली नाही म्हणून थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याचा 80 कोटी रुपयांचा थकहमीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला.
नगर जिल्ह्यात कोल्हे व विखे वाद आहे. विवेक कोल्हे यांचीही कर्जकोंडी करण्यात आली. कोल्हे यांची भाजप उमेदवार सुजय विखे यांना लोकसभा निवडणुकीत मदत झाली नाही म्हणून त्यांच्या कारखान्याचा 125 कोटींचा कर्ज प्रस्ताव नाकारण्यात आला. अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी कारखान्याला 347 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले, असे आरोपही शिवसेनेच्या लेखात करण्यात आले आहेत.