Crime News : तक्रार करायला गेलेल्या पीडित तरुणीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या भंडाऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांना बडतर्फ करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे पोलिस महासंचालक व पोलिस उपमहानिरीक्षक यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी माजी गृहमंत्री तथा शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांनीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अशी मागणी केली. तक्रारकर्त्या पीडितेला शरीरसुखाची मागणीचे प्रकरण भंडाऱ्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक बागुल यांना चांगलेच भोवणार आहे. विरोधी पक्षनेत्यांनी हा मुद्दा अधिक गांभीर्याने घेत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
नागपूर येथे इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असलेल्या लाखनी तालुक्यातील तरुणीची नागपुरातील तरुणासोबत ओळखी झाली आणि त्यातून प्रेमप्रकरण पुढे गेले. दोघांनी गुपचूप लग्न लावून संसार थाटल्यानंतर तरुणीने रितसर लग्नाचा तगादा लावला आणि तरुणाने पळवाट काढली. या प्रकरणात मानसिकदृष्ट्या खचलेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने ती बचावली. त्यानंतर तिने प्रियकराविरुद्ध तक्रारीचा निर्णय घेतला आणि भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्याकडे तक्रार केली. पण बागुल महिलेला सोबत घेउन आलेल्या तरुणीला एकटी भेटण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी तिला शरीर सुखाची मागणी केली. तरुणीने सामजिक संघटनांना याची माहिती यांना दिली. त्यानंतर पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले व बागुलांवर गुन्हा दाखल करण्याचे अधीक्षकांनी आदेश दिले.
अधिकाऱ्याला अटकपूर्व जामीन
भंडाराच्या प्रकरणाने राजकीय वातावरण तापू लागले आहे. हे बघता पोलीस उप महानिरीक्षकाकडून माहिती मागवली गेली असल्याची खात्रिशिर माहिती मिळाली आहे. नुकतेच लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतिला मिळालेले अपयश लक्षात घेता हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यावर कारवाई होणार यात शंका नाही. अधिकारी निलंबित होणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळते आहे. दरम्यान अधिकारी अशोक बागुल यांना अटक पूर्व जामीन मिळाल्याचे समोर आले आहे.
Bhandara Police : भंडाऱ्याचा ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची गृह खात्याद्वारे चौकशी?..
अशोभनीय कृत्य
अशा पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हे कृत्य घृणास्पद असून अशोभनीय आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलीन होत आहे, असे नाना पटोले यांनी म्हणाले आहे. अशा बेजबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे. भंडारा पोलिस उपविभागीय अधिकारी अशोक बागूल यांना तत्काळ निलंबित करून सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे पोलिस महासंचालक व पोलिस उपमहानिरीक्षक यांच्याकडे केली आहे.