Mahayuti 2.0 : देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांची पक्षाच्या गटनेतेपदी एकमताने निवड झाली. त्यांच्या निवडीचे राजकीय वर्तुळात स्वागत होत आहे. राज्यात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले असून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी तर आमच्यासाठी दिवाळीचा दिवस असल्याची सार्थ प्रतिक्रिया नोंदवली आहे.
यंदाच्या निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने भरीव यश संपादन केले. पण भाजपाला मिळालेले यश ऐतिहासिक आहे असे आशिष शेलार म्हणाले. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीवर आनंद व्यक्त केला. आाल्याला आनंद होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्वाचा ठरेल असेही त्या म्हणाल्या.
गद्दारांना गाडले
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी देवेंद्र फडणवीस यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत, याचा अभिमान वाटतो असेही त्यांनी नमूद केले. 2016 मध्ये जनतेने अखंड महाराष्ट्रासाठी, सर्वांगीण विकासासाठी भाजप शिवसेना युतीला कौल दिला होता. उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली. आता या गद्दारांना गाडून महायुतीचे सरकार शंभर टक्के जनादेश मिळवून सत्तेवर येत आहेत. असा टोलाही त्यांनी हाणला.
माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीचे कौतुक केले आहे. महाराष्ट्रातीला विकसित राज्य बनवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या अनुभवी नेत्यांची गरज होती. आम्ही त्यांच्या पाच वर्षाच्या सरकारचा अनुभव घेतला आहे. मी मंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. आम्ही केवळ मिळालेले बहुमत आणि सन्मान यातच खुश आहोत, असे भागवत कराड म्हणाले.
महाविजयाचे शिल्पकार
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील महायुतीच्या महाविजयाचे महाशिल्पकार आहेत. तेच मुख्यमंत्री व्हावे, हे महाराष्ट्राच्या मनात होते, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी व्यक्त केली आहे. त्यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाल्याने त्यांचा मुख्यमंत्री पदासाठीच्या मार्ग प्रशस्त झाला आहे, असेही ते म्हणाले.
Devendra Fadnavis : गडकरींनी शब्द टाकला अन् देवेंद्र राजकारणात आले!
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी, युवक, शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, व्यापारी अशा सर्व समाजघटकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून महायुतीला मोठे यश मिळवून दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र वेगाने प्रगती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.