महाराष्ट्र

BJP : देवेंद्रांचे आसन कायम! विधानसभाही त्यांच्याच नेतृत्वात

Chandrashekhar Bawankule : दिल्लीतील बैठकीनंतर मोठे बदल नाहीत

Maharashtra Politics : महाराष्ट्रात भाजपचा दारूण पराभव झाला आहे. या पराभवानंतर दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाच्या आसनावर कायम ठेवण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून आमदार चंद्रशेखर बावनकुळे हेच काम पाहणार आहेत. अशात महाराष्ट्रात भाजपचे नेतृत्व फडणवीस हेच करतील असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आता कंबर कसली आहे. नरेंद्र मोदी मोदी सरकारच्या नवीन योजना भाजप मतदारांपर्यंत पोहचविणार आहे. याशिवाय जुलै महिन्यात भाजपाची धन्यवाद यात्राही काढण्यात येणारर आहे. महाराष्ट्रात भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत. तेच राज्याचे नेतृत्त्व करतील, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. सर्व विधिमंडळ सदस्यांनी आणि प्रदेश भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती केली, असे ते म्हणाले.

अधिक विकासासाठी प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारच्या विकासाच्या योजना महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील पाच वर्ष महायुती सरकार काम करेल. त्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये कायम राहणे आवश्यक आहे. ज्या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अर्धा टक्केपेक्षा कमी मतांनी मागे राहिला, त्याविषयी चर्चा झाली. केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा व विचार विनिमय करण्यात आला. जेथे कमी पडलो आहोत, त्या ठिकाणी अधिकच काम करण्यात येणार आहे. विधानसभेत ही पोकळी भरून काढण्यासाठी सरकार काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Vijay Wadettiwar : वारंवार बदली कशाला? एकदाच पाठवून द्या अमेरिका किंवा चीनला..

महाराष्ट्रात धन्यवाद यात्रा

लोकसभा निवडणुकीत मतदारांनी एनडीएला पाठबळ दिले. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्रात भाजपा धन्यवाद यात्रा काढणार आहे. महाराष्ट्रातील सर्व आमदार-खासदार, संघटनेतील सर्व पदाधिकारी जुलै महिन्यात धन्यवाद आभार दौरा करतील. ज्या मतदारांकडे आम्ही मत मागण्यासाठी जाऊ त्यांना मोदी सरकारच्या नवीन योजना देखील सांगण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढील पाच वर्षात भरपूर कामे होतील. या विकासकामांचा व योजनांचा लाभ महाराष्ट्रातील जनतेला मिळेल. महाराष्ट्राच्या विकासाला त्यातून चालना मिळेल.

पवार बरेच बोलले

शरद पवारांबाबत बावनकुळे म्हणाले की, त्यांनी आतापर्यंत मोदींवर बरीच टीका केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून ही मंडळी सतत मोदींबद्दल वाटेल ते बोलत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेनेही त्याची नोंद घेतली आहे. महाविकास आघाडी यशाने थोडे हुरळले आहेत. आता ते खालच्या पातळीवर नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत आहेत. महायुतीचे सर्व नेते एकत्र काम करीत आहेत. महायुतीच्या माध्यमातून सर्व पुढे जाणार आहेत. अजित पवार गटाकडून सांगण्यात येत आहे की, दादांना टार्गेट केले गेले तर वेगळा विचार करू. याबाबत बावनकुळे म्हणाले, आमच्याकडून असे कोणी बोललेले नाही. असा कोणी प्रयत्न देखील करत नाही.

भुजबळांच्या नाराजीचे पाहणार 

छगन भुजबळ यांना विचारावे लागेल की त्यांची नाराजी काय आहे. भुजबळ यांच्या भूमिकेबद्दल आपण मत व्यक्त करणे योग्य ठरणार नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!