महाराष्ट्र

NCP News : दादांसाठी फडणवीसांकडून दिल्लीत फिल्डिंग

Modi 3.0 : मंत्रिमंडळात अजित पवारांना मोठा धक्का

BJP Politics : लोकसभा निवडणुकीत महायुती सोबत सहभागी झालेल्या अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी पसरली आहे. त्यामुळे नाराज अजित पवारांची राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मनधरणी सुरू आहे. दुसरीकडे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या भेटीला गेले. त्यांच्यासाठी दिल्लीत फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. लोकसभेत एकाच जागेवर दादांना समाधान मानावे लागले. अजित पवारांना मंत्रिमंडळात सामावून घेण्याबाबत दिल्लीतील पक्षश्रेष्ठी कितपत रस दाखवतात हे पाहण्यासारखे आहे. मंत्रिमंडळाची अंतिम यादी सायंकाळी फायनल होणार आहे. अजित पवार आशावादी असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रातून सहा जणांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे. महाराष्ट्रातून भाजपकडून नितीन गडकरी, पीयूष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे यांना फोन गेला आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना संधी देण्यात आली आहे. आरपीआयकडून रामदास आठवले पुन्हा मंत्री असणार आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रातून एनडीए सरकारमध्ये सहा जणांना मंत्रिपदासाठी कळविण्यात आल्याची माहिती आहे. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मंत्रीपदासाठी फोन न आल्याची माहिती आहे. त्यामुळे आजच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवार गटात नाराजी पसरल्याची माहिती मिळत आहे.

दादांची पावर झाली कमी

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. तुलनेत महाविकास आघाडीने राज्यात 30 जागा जिंकल्या. युतीला 17 जागांवर समाधान मानावे लागले. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस फुटून महायुतीत सहभागी झालेल्या अजित पवार गटालाही फारसे यश मिळाले नाही. केवळ एकच जागा या पक्षाला जिंकता आली. एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. त्यांच्या सोबत काही मंत्री शपथ घेणार आहेत.

शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना फोन वरून कळविण्यात आले आहे. राज्यातील सहा जणांमध्ये शिंदे गटाला एका मंतत्रिपदाची लॉटरी लागली आहे. शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना संधी देण्यात आली आहे. मात्र यात अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिल्लीत तळ ठोकूनही पदरी निराशाच पसरली आहे.

एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला संधी मिळालेली नाही. दोन तास खासदार सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अजित पवार यांच्या मनधरणींचे प्रयत्न सुरू आहेत. अजितदादांना धक्का देत पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारापासून त्यांना दूर ठेवण्यात येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दिल्लीमध्ये सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी खलबते सुरू आहेत. दिल्लीत अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची बैठक झाली.

NCP : जयंत पाटील लवकरच अजित पवार गटात?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तटकरेंच्या निवासस्थानी दाखल झालेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक सुरु झाली आहे. अजित पवार गट वेटिंगवर असल्याने फडणवीसांनी तातडीने तटकरेंच्या निवासस्थानी दाखल होत चर्चा सुरू केली. तरीही अनेक मोठे बदल होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

error: Content is protected !!