देश / विदेश

Devendra Fadnavis : आरक्षणविरोधी कोण? राहुल गांधींनी सिद्ध केलं !

Rahul Gandhi : ते खोटं नरेटीव तयार करतात, हे परदेशातील वक्तव्याने स्पष्ट

Reservation In India : राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा हा परदेशातील त्यांच्या वक्तव्याने समोर आला आहे. राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोलले आहेत. एकीकडे निवडणुकीत खोटा नरेटीव तयार करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट करायची, हे पूर्णतः चुकीचे असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

सन्मान केला नाही

नागपुरात बुधवारी (ता. 11) पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले.भारताच्या संविधानाचा किंवा संविधानकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने कधीच सन्मान केला नाही. बाबासाहेबांना पराभूत करणारी हीच काँग्रेस आहे. काँग्रेसने त्यांना लोकसभेतही जाऊ दिलं नाही. दोन वेळा षडयंत्र करून त्यांनी बाबासाहेबांना पराभूत केलं.

काँग्रेसचे नेते केवळ मते मिळवण्याकरीता खोटं नरेटीव तयार करतात. हे आता राहुल गांधींच्या परदेशातील वक्तव्यामुळे स्पष्ट झालं आहे. भारतीय जनता पक्ष आरक्षण विरोधी असल्याचा आरोप ते करतात. पण भाजप आरक्षणविरोधी नव्हे तर आरक्षणाच्या बाजुने आहे. कुठल्याही परिस्थितीत, कुणालाही आरक्षण बंद करू दिलं जाणार नाही, असंही फडणवीस म्हणाले.

फक्त दिशाभूल करणे

संविधान हातात घेऊन ‘संविधान खतरे में हैं’ची बतावणी केली. दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांची दिशाभूल करून सत्ता काबिज करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देशातील दलित आणि आदिवासींना कसा धोका आहे, हे संभ्रमित करून पटवून देण्याचा प्रयत्न. अशा अनेक कृती मागील काही महिन्यांत राहुल गांधींनी केल्या. मात्र आता त्यांच्या आरक्षणविरोधी षडयंत्राचा बुरखा फाटला आहे.

Provident Fund : भविष्य निर्वाह निधीवर कर्मचाऱ्यांचा डल्ला !

 षडयंत्र फक्त ..

ज्यांच्या रक्तातच दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचा तिरस्कार आहे. त्यांचे सत्य जास्त काळ लपून राहू शकत नाही. शेवटी जी काँग्रेसची नियत आहे, ती आज जगापुढे आली आणि राहुल गांधींनी आरक्षण रद्द करण्याचा त्यांचा मनसुबा जगापुढे मांडला. अखेर राहुल गांधींच्या आरक्षण विरोधी षडयंत्राचा बुरखा फाटला.

सर्वाधिक काळ सत्तेत राहूनही मागासवर्गीयांचे आरक्षण लागू न करणे, जातीय जनगणना करण्यापासून पळ काढणारा काँग्रेस पक्ष आज मात्र दलित, आदिवासी, मागासवर्गीयांच्या जीवावर सत्तेत येण्याचे स्वप्न पाहत आहे. आता विदेशात जाऊन राहुल गांधींनी त्यांच्या मनसूब्याचे दर्शनच घडविले आहे. राहुल गांधींचे वक्तव्य म्हणजे काँग्रेसकडून आरक्षण संपविण्यासाठी सुरू असलेल्या खटाटोपाचा पुरावा असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

error: Content is protected !!