Maharashtra Legislature : मुंबई येथे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सोमवारी 1 जुलै रोजी या अधिवेशनाचा चौथा दिवस. यात पेपरफूट, भरती घोटाळा असे अनेक विषय प्रकर्षाने मांडले जात आहेत. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण सुरू केले आहे. पेपरफुट प्रकरणावर चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रश्नोत्तर तासादरम्यान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेण्याचा प्रयत्न केला. असे करताना त्यांनी व्हॉट्सॲप वरील मॅसेज वाचून दाखवला. आता या फेक व्हाट्सअप मॅसेज वायरल करणाऱ्यांवर गुन्हा नोंद करणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी सभागृहात केली आहे.
ज्याचा फेक मॅसेज ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी वाचून दाखवविला ते या गुन्ह्यात वाचले असले तरी, ज्यांनी हा मेसेज लिहिला आणि तो व्हायरल केला त्याच्यावर गुन्हा नोंद होणार, अशी घोषणा गृहमंत्र्यांनी सभागृहात केली आहे. त्यामुळे असा फेक मॅसेज वायरल करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
यंदाच्या पावसाळी अधिवेशनात नेरेटिव्ह या शब्दामुळे प्रचंड गदारोळ सुरू आहे. विरोधक लोकांमध्ये नेरेटिव्ह बातम्या पसरवून संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप सत्ताधारांकडून केला जात आहे. आज प्रश्नोत्तरी कालावधीत विरोधकांकडून पेपर फुटी प्रकरण आणि नोकर भरती प्रकरणावरून सरकारला चांगलेच घेरण्याच्या प्रयत्न केला गेला. परीक्षा घेणाऱ्या संस्था कुठे कशा चूक ठरत आहेत, याचा मुद्दा विरोधकांकडून मांडला जात आहे. युवकांचे भवितव्य लक्षात घेण्यासाठी याबाबत सरकारने कठोर पावले उचलावी, अशा सूचनाही विरोधकांकडून केल्या जात आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सर्वात जास्त पेपर फुटी आणि नोकर भरती घोटाळा शिंदे सरकारच्या काळामध्ये झाल्या याबाबत आणि तसा मोबाईलवर मॅसेजही वाचून त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले आहे. असे प्रकार थांबविले जावे, अशा सूचनाही त्यांनी सरकारला देत याबाबत गृहमंत्री फडणवीस यांना खुलासा मागितला आहे.
मला सर्वच माहिती
मी गृहमंत्री आहे. मला सर्व माहिती आहे. तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर सुरू आहे. फडणवीस म्हणाले, तुम्ही जी माहिती दिली आहे, ती माहिती व्हॉट्सॲपवर आलेली आहे. ती तुम्ही स्वतः तशीच्या तशी वाचून दाखविली आहे. यासाठी पुण्याची एक संस्था जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. काही लोक या संस्थेचा वापर करत असल्याचे फडणवीस म्हणाले आहे. आता त्या संस्थेवर तसेच हा फेक व्हॉट्सॲप मॅसेज व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा नोंद करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. या संस्थेचा वापर कोण करत आहे, याचा खुलासाही होणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. शिवाय पेपर दरम्यान परीक्षार्थींनी घालून आणलेले दागिने सुद्धा तपासले जाणार असेही फडणवीस म्हणाले. त्यामुळे भास्कर जाधव यांचा प्रश्न कोणावर भारी पडते पाहणे विशेष महत्त्वाचे ठरणार आहे.