महाराष्ट्र

PM Oath Ceremony : ताई अन‌् देवाभाऊ शेजारी..शेजारी..

Maharashtra BJP : शपथविधी सोहळ्यातील उपस्थितांचे वेधले लक्ष

Devendra Fadnavis & Pankaja Munde  : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देण्याची मागणी होत आहे. मंत्रिपदी वर्णी लागली नसली तरी पंकजा शपथविधी सोहळ्यात होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी शेजारी त्या बसून होत्या. फडणवीस आणि मुंडे यांना शेजारी, शेजारी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये मुंडे ‘साइड ट्रॅक’वर होत्या. त्यांना यंदा भाजपने लोकसभा निवडणूक लढविण्याची संधी दिली.

निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. पराभवानंतरही त्यांच्या समर्थकांनी बीड परिसरात आंदोलन केले. पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्री करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यासाठी अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली. त्यानंतर पंकजा यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यातच रविवारी (ता. 9) दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याला पंकजा यांनी हजेरी लावली.

राजकीय चर्चांना उधाण

शपथविधी सुरू असताना अनेकांची नजर महाराष्ट्रातील नेत्यांवर होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकमेकांच्या शेजारी बसून असल्याचे दिसले. विशेष म्हणजे भाजपचे हे दोन्ही नेते अत्यंत हास्यमुद्रेने चर्चा करीत होते. महाराष्ट्र भाजपात पंकजा मुंडे यांच्या खच्चीकरणामागे फडणवीस असल्याचा आरोप होतो. गेल्या अनेक दिवसांपासून मुंडे नाराज होत्या. महायुती सरकारमध्येही त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. आपल्या मतदारसंघात त्या पक्षसंघटन मजबूत करण्याचे काम करीत होत्या.

PM Oath Ceremony : काहींनी केले अभिवादन, काहींनी गडकरींना टाळले

भाजपने सर्वेक्षण केल्यानंतर पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. मात्र त्यातही त्यांचा पराभव झाला. त्यानंतर एका युवकाने पंकजा यांच्या संदर्भात सोशल माध्यमावर पोस्ट टाकली. त्यानंतर या भागात तणाव होता. अशातच रविवारी बीड आणि आसपासच्या परिसरात बॅनरबाजी झाली. सायंकाळी उशिरापर्यंत पंकजा यांना मंत्रिपद मिळावे अशी मागणी कार्यकर्त्यांची होती. पण ती पूर्ण झाली नाही..

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!