महाराष्ट्र

Maharashtra BJP : ‘देवाभाऊ’च भाजपच्या गटनेतेपदी 

Mahayuti 2.0 : मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या मार्ग आणखी प्रशस्त 

Maharashtra New CM : महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदासाठीचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे. बुधवारी (4 डिसेंबर) मुंबईत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीमध्ये केंद्राकडून दोन जणांना निरीक्षक म्हणून पाठवण्यात आलं होतं. यामध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीताराण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री तथा पंजाबचे प्रभारी विजय रूपाणी यांचा समावेश होता. शिवप्रकाश, विनोद तावडे हे देखील बैठकीला उपस्थित होते. 

विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते विजय रूपाणी यांनी गटनेता निवडीच्या प्रक्रियेला प्रारंभ केल्याची घोषणा केली. त्यानंतर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडत आहे, असे पाटील म्हणाले. महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे देवेंद्र फडणवीस असा उल्लेख मुनगंटीवार यांनी यावेळी केला.

माजी मंत्री तथा भाजपचा नेत्या पंकजा मुंडे आणि प्रवीण दरेकर यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. जळगाव जामोदचे डॉ. संजय कुटे यांनीही या प्रस्तावाला अनुमोदन दिले. रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेकांनी फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिले. त्यानंतर नियमाप्रमाणे फडणवीस यांची निवड विधिमंडळ गटनेतेपदी करण्यात आली. त्याची घोषणा केंद्रातून आलेल्या पक्षाच्या निरीक्षकांनी केली.

Chief Minister : सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटलांनी मांडला प्रस्ताव, फडणवीसांची गटनेतेपदी निवड !

कायापालट होणार

भारतीय जनता पार्टीचा इतिहासातील सर्वात मोठे यश मिळालं आहे. पक्षाने 135 जागा निवडून आल्या आहेत. सात अपक्ष आमदारांनीही महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीला बहुमत मिळाले आहे. जनतेचा विश्वास भाजपवर आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही निवडणूक भाजपने लढवली, असे यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी जोमाने काम केले. आता पुढील पाच वर्ष महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक असे असतील, असेही बावनकुळे म्हणाले. या यशाबद्दल महाराष्ट्रातील 14 कोटी मतदार आणि 35 लाख कार्यकर्त्यांचे बावनकुळे यांनी आभार मानले.

अनेकांची स्तुतीसुमनं

गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बैठकीत स्तुतीसुमनं उधळली. देवेंद्र फडणवीस बहुजनांचे नेते आहे, असे ते म्हणाले. आशिष शेलार यांनी समस्त मुंबईकरांच्या पाठिंबा देवेंद्र फडणवीस यांना असल्याचे यावेळी जाहीर केले. कोअर कमिटीच्या या बैठकीचे सूत्रसंचालन अकोला पूर्वचे विजयी उमेदवार रणधीर सावरकर यांनी केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!