हरियाणाच्या 57 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पक्षाने सलग तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. भाजपने हरीयाणा निवडणुकीत मुसंडी मारली. भाजपने 22 नवीन जागा जिंकल्या आणि विद्यमान 27 जागा वाचवण्यात यश मिळवलं. हरियाणातील भाजपच्या विजयावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘हरियाणात भाजपच्या विजयाची हॅट्ट्रिक हे दर्शवते की लोकांनी विविध मुद्द्यांवर विरोधकांच्या भाषणांचा पराभव केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ढोंगी राजकारण उघड झाले आहे. त्यांचे ‘नाटक’ हरियाणातील जनतेने नाकारले आहे,’ असे ते म्हणाले आहेत.
जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत भाजप आणि केंद्र सरकारने पाकिस्तानच्या अपप्रचाराला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचेही फडणवीस म्हणाले. विरोधकांना मुहतोड जवाब देण्यात आला, असं ते म्हणाले. ‘पुढील महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हरियाणाच्या कामगिरीची पुनरावृत्ती करू,’ असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, जे स्वप्नात जगत आहेत ते आता जमिनीवर येतील. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाचाही त्यांनी संदर्भ दिला.
‘गेल्या 60 वर्षांत पहिल्यांदाच हरियाणात सलग तिसऱ्यांदा एक पक्ष सत्तेवर आला आहे. अग्निपथ योजना आणि ऑलिम्पिक खेळाडूंच्या माध्यमातून विरोधकांनी आपले कथन पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. जातीचे राजकारणही केले. मात्र, हरियाणातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या दृष्टीकोनाला निवडून दिले. निवडणुकीपूर्वी राहुल गांधींनी खूप नाटकं केली, पण आता त्यांच्या फंदात कोणी पडणार नाही,’ असंही ते म्हणाले.
Haryana Elections : वंचितने सांगितलं काँग्रेसच्या पराभवाचं कारण!
पाकिस्तानच्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर
फडणवीस म्हणाले की, जम्मू-काश्मीर निवडणुकीत भाजप आणि केंद्र सरकारने पाकिस्तानच्या अपप्रचाराला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर रस्त्यावर रक्तपात होईल असे काही लोक म्हणाले होते. लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांचा प्रचारही फोल ठरला आहे. आम्ही जगाला दाखवून दिले आहे की, जम्मू-काश्मीरमधील लोक लोकशाही प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. भारत सरकार आणि भारत निवडणूक आयोग तेथे निःपक्ष निवडणुका घेऊ शकतात हा एक मजबूत संदेश आहे. इतर अनेक देशांनी पाठवलेल्या निरीक्षकांनीही निवडणुकांच्या निःपक्षतेचे निरीक्षण केले आहे.
हरियाणात जल्लोष
निकालानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हरीयाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांच्याशी संवाद साधला. नड्डा यांनी सैनी आणि प्रदेश भाजपला शुभेच्छा दिल्या. हरियाणा भाजपच्या राज्य मुख्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला.