BJP Vs Shiv Sena : पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. अमित शाह यांना अब्दालीचे वंशज तर फडणवीस यांना ढेकूण संबोधले. ठाकरे यांच्या या वक्तव्याला फडणवीस यांनी नागपुरात प्रत्युत्तर दिले. फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा डोक्यावरचा ताबा सुटला आहे. पराभवामुळे ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. या वैफल्यातूनच त्यांचे संतुलन बिघडल्याचे फडणवीस म्हणाले.
मुंबई (Mumbai) येथील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांना संपविण्याची भाषा केली. एक तर तू राहशील किंवा मी राहिल असे ठाकरे म्हणाले होते. ठाकरे यांच्या या वक्तव्याचा भाजपने आधीच समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपने सडकून टीका केली आहे. अशातच ठाकरे यांनी शनिवारी (ता. 03) पुण्यातील (Pune) शिवसंकल्प मेळाव्यात पुन्हा शाह आणि फडणवीस यांच्यावर हल्ला चढविला. मात्र यावेळी त्यांची जीभ चांगलीच घसरली.
चोख उत्तर दिले
आपल्या पायाशी कलिंगड ठेवले होते. मुळे काही जणांना वाटले की मी त्यांना आव्हान दिले, असे ठाकरे म्हणाले. ठाकरे यांचे वक्तव्य येताच नागपुरात फडणवीस यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. डणवीसांनी उद्धव ठाकरे डोके बिघडल्यासारखे बोलत असल्याचे म्हटले. उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत वैफल्यग्रस्त झाले आहे. या वैफल्यातूनच ते अशा प्रकारचे शब्द वापरत आहे. त्यावर काय उत्तर देणार? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. वैफल्यातून आणि निरशेतून ते डोके बिघडल्यासारखे बोलत असतील, त्याला त्यासंदर्भात काय बोलायचे असा प्रश्न पडतो, असे फडणवीस म्हणाले. अमित शहा यांनी ते औरंगजेब फॅन क्लबचे असल्याचे म्हटले होते, तेच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सिद्ध करत असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला.
सचिव वाझे यांच्यासंदर्भातही त्यांनी प्रसार माध्यमांजवळ प्रतिक्रिया व्यक्त केली. सचिन वाझे यांनी मला पत्र पाठवले असल्याचे मला माध्यमातूनच कळाले आहे. मात्र, असे काही पत्र आले आहे का? हे मी अद्याप पाहिलेले नाही. त्यासंदर्भात ठाऊक नाही. वाझे यांचे काही पत्र आले आहे काय यासंदर्भात चौकशी करतो. त्यानंतरही यासंदर्भात बोलता येईल. जे काही समोर येत आहे त्या संदर्भात योग्य ती चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वाझे यांच्या पत्रानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. अनिल देशमुख यांनी वाझे हे फडणवीस यांचे हस्तक असल्याचा आरोप केला आहे. आपण फडणवीसांवर आरोप करायला सुरुवात केल्यानंतरच वाझे पुन्हा उगवले आहेत, असेही देशमुख म्हणाले.