Assembly Election : सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट केला. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक उपक्रम आणि योजना आणल्या. त्यांच्या नेतृत्वात बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याच्या विकासाची बुलेट ट्रेन अधिक वेगाने धावू शकेल. त्यासाठी त्यांचेच हात बळकट करण्याची गरज आहे. मतदारांनी त्यांच्या पाठिशीच उभे राहावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी (13 नोव्हेंबर) केले.
राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूचे पालकमंत्री, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ दुर्गापूर येथे नितीन गडकरी यांची सभा झाली. त्यावेळी गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले, ‘मी 40 वर्षांपासून चंद्रपूरला येत आहे. गेल्या काळात चंद्रपूर पूर्णपणे बदलले आहे. प्रत्येक क्षेत्रात मुनगंटीवार यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. स्व. रतन टाटांचे अलीकडेच निधन झाले. पण ते हयातीत असताना एकदा मला भेटले. टाटा सुधीर मुनगंटीवार यांच्याविषयी बोलत होते.
गडकरींनी सांगितला अनुभव
गडकरी म्हणाले, चंद्रपूरला चांगले इंजिनिअरिंग कॉलेज झाले पाहिजे. सर्व सुविधांयुक्त कॅन्सर हॉस्पिटल झाले पाहिजे, यासाठी मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना आमचे ट्रस्ट सहकार्य करणार असल्याचे रतन टाटांनी सांगितेल. टाटांच्या बाबतीतील हा अनुभव सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीरपणे सांगितला. त्यावेळी आपल्याला प्रचंड आनंद झाला. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उत्तम उद्यान साकाकरले. खेळांची मैदाने सुसज्ज केली. उद्योग आणले. त्यातून तरुणाईच्या हाताचा काम मिळालं. ताडोबाला आंतरराष्ट्रीय नकाशावर महत्त्व प्राप्त करून देण्यात मुनगंटीवार यांचा मोठा वाटा आहे. आपल्या भागाच्या विकासासाठी आवश्यक असलेली प्रत्येक योजना, प्रत्येक उपक्रम त्यांनी राबविला.
सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचे वनमंत्री म्हणून जागतिक विक्रम केला. 50 कोटी झाडं लावणारा, पर्यावरणासाठी मोठं योगदान देणारा देशातील पहिल्या क्रमांकाचा नेता म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचा उल्लेख आहे. रस्त्याच्या बाजूला झाडं लावून पर्यावरण संवर्धनाचं कार्य करण्यासाठी आपण आपल्या अधिकाऱ्यांनाही मुनगंटीवारी यांच्याकडं पाठविलं, असंही गडकरी यांनी अभिमानानं नमूद केलं. पर्यावरणाबाबत मुनगंटीवार यांचं मार्गदर्शन घ्या असा सल्ला अधिकाऱ्यांना दिल्याचं ते म्हणाले.
महामार्गाचं श्रेय मुनगंटीवारांना
2014 पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नव्हता. गेल्या 10 वर्षांत 474 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग नव्याने निर्माण झालेत. त्याचे श्रेय गडकरींनी सुधीर मुनगंटीवार यांनाच आहे. आता त्यांच्याच प्रयत्नांमुळे समृद्धी महामार्गालाही चंद्रपूरशी जोडले जाणार आहे, याचाही गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला. सुधीर मुनगंटीवार जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला. सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण क्षेत्रात काम करताना पायाभूत सुविधा विकसित केल्या. महाराष्ट्रात सर्वांत चांगलं काम करणाऱ्या पहिल्या पाच आमदारांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचं नाव आवर्जून घ्यावे लागेल, असं काम त्यांनी केल्याचं गडकरी म्हणाले.
कोणताही जातीवाद न करता चंद्रपूर जिल्ह्याचं भविष्य बदलवण्याची क्षमता असलेला आणि विकासासाठी तळमळीनं काम करणारा लोकनेता लोकप्रतिनिधी सुधीर मुनगंटीवार यांच्या रुपात पुन्हा एकदा लाभेल. मुनगंटीवार पुन्हा मंत्री होतील आणि विकासाची बुलेट ट्रेन तिप्पट वेगानं धावेल. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील प्रगतीशील जिल्हा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा द्यावा, असं आवाहनही गडकरी यांनी केलं.
सर्व काही विकासासाठी
अपण नितीन गडकरींचे शिष्य आहोत. जनतेच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.आम्ही सदैव विकासाचे राजकारण करतो. जातीवादाचे नाही. आपल्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंब आपले कुटुंब आहे. त्यामुळं आपलं प्रत्येक पाऊल मतदारसंघाच्या विकासासाठी आहे, असा निर्धार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात पाच हजार घरकूल आणले. कुणीही कच्च्या घरात राहणार नाही, याचा निर्धार आपण केला आहे. त्यामुळं अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, एनटी कुणीही असले, तरीही पक्के घरकूल देणारच आहे, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
मित्तल ग्रुपसोबत 40 हजार कोटींचा सामंजस्य करार झाला आहे. पाच हजार एकरमध्ये हा उद्योग उभा होणार आहे. यातून 20 हजार थेट तर 80 हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत, असेही मुनगंटीवार म्हणाले. महायुतीचे सरकार आल्यानंतर ओबीसी, एससी, एसटी कुणीही असले तरीही व्यवसायासाठी 15 लाखांपर्यंतचे कर्ज शून्य व्याजाने देण्याचे सरकारनं ठरविले आहे, असेही मुनगंटीवार यांनी ठामपणे सांगितले.