Bjp News : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. राज्याचे गृहमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभांचा धडाका लावला आहे. रावेर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांची भुसावळ मध्ये 7 मे रोजी रात्री सभा झाली. त्यांचे भाषण सुरू असताना अचानक वीज पुरवठा खंडित झाला.
Maharashtra Lok Sabha Election : वंचित मध्ये उमेदवारीसाठी सेटलमेंट
विकासाची गोष्ट मात्र बत्ती गुल
रक्षा खडसे निवडून आल्यानंतर आपल्याला विकासापासून कोणीच थांबवू शकणार नाही असे म्हणताच अचानक बत्ती गुल झाली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी भाषण थांबवले नाही. दरम्यान, उपस्थितीतांनी मोबाईलचे टॉर्च सुरू केले. मात्र, ऊर्जामंत्री फडणवीस यांच्याच सभेत वीज पुरवठा खंडित झाल्याची चर्चा होऊ लागली.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात रावेर मतदारसंघात निवडणूक होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात याबाबत उल्लेख केला. ‘काही काळजी नाही तुमचे लाईट सुरु झाले. अरे आपला करंटच असा आहे की या लाईटची आवश्यकता नाही’. डब्ब्यामध्ये आपण बसलो तर हा डबा मोदींच्या डब्याला लागणार आहे. त्यानंतर आपल्याला विकासापासून कोणीच थांबवू शकणार नाही.’ टॉर्चचे लाईट लागल्याने काय सुंदर दृश्य आहे बघा. हमको रोक सके ये किसी अंधेरेमें दम नही, रोशनी हमसें है रोशनी से हम नहीं, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. आणि उपस्थितात हशा पिकला.