महाराष्ट्र

Akola constituency : फडणवीस देतील विजयाचा कानमंत्र!

Devendra Fadnavis : जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद; मोर्चेबांधणीला वेग

BJP Meeting : नुकतीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघाचा गड भाजपने राखला. पण तरीही मतदानात फटका मात्र बसला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघावर अधिक फोकस असणार आहे. त्यासाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. रविवारी (ता.11) भाजपच्या जिल्हा विस्तारित कार्यकारणीच्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती राहणार आहे. या बैठकीसाठी सुमारे पाच हजार सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.

लक्ष विधानसभेचे

लोकसभा निवडणुकीत अकोल्याचा गड भाजपने राखला आहे. तर अकोला जिल्ह्यातील पाच पैकी चार मतदारसंघात भाजपचा आमदार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला यश जरी मिळाले असले तरी महाविकास आघाडीच्या म्हणजेच काँग्रेसच्या उमेदवाराला चांगलं मतदान झालं आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसू नये म्हणून भाजप आतापासूनच जिल्ह्यात ऍक्शन मोडवर आला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यातील मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा फटका बसला. याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीवर अधिक फोकस करण्यात येत आहे. अकोल्याचा जर विचार केला तर जिल्ह्यात भाजपची ताकद मोठी आहे. शहरासह ग्रामीण भागात पक्षाची चांगली पकड आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले. मात्र आता विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश अकोला जिल्ह्यातून मिळावे यासाठी भाजप ऍक्शन मोडवर आला आहे. अकोला शहरात उद्या 11 ऑगस्ट राेजी आयाेजित भाजपच्या जिल्हा विस्तारित कार्यकारणीच्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखखर बावनकुळे हे येणार आहेत. या बैठकीसाठी 5 हजार सदस्यांना भाजप नेते मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे.

Raj Thackeray : माझ्या वाट्याला जाऊ नका

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी भाजपकडून संघटन बांधणीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. पक्षातील जुनेजाणते माजी पदाधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्याचे पक्षश्रेष्ठींचे निर्देश आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नुकतीच जिल्हा कार्यकारिणीत अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा विस्तारित कार्यकारिणीचा आढावा व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 11 ऑगस्ट राेजी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील दीक्षांत सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

यांची बैठकीला उपस्थिती

बैठकीचे उदघाटन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा.अनुप धाेत्रे, आ.डाॅ. संजय कुटे, चैनसुख संचेती, प्रदेश सरचिटणीस आ.रणधीर सावरकर, आ.वसंत खंडेलवाल, आ.हरीश पिंपळे, आ.प्रकाश भारसाकळे उपस्थित राहतील. तसेच समारोपासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!