महाराष्ट्र

Sanjay Gaikwad : ‘माझ्या विरोधातील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार’

Shiv Sena : आमदार संजय गायकवाड यांचा दावा

लवकरच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर आता सहा राजकीय पक्ष तयार झाले आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र बुलढाणा मतदारसंघात सर्व काही आलबेल असल्याचे सध्या तरी चित्र आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी ‘माझ्या विरोधातील उमेदवाराचा डिपॉजिट जप्त होणार आहे’, असा दावा केला आहे.

आमदार संजय गायकवाड म्हणाले की, ‘ज्यांना विधानसभा निवडणूक लढवायची आहे त्यांनी नक्कीच लढवावी. आता प्रत्येक जण चार चार पक्षांकडे जात आहेत. कुणी शरद पवार गटांकडे, कुणी ठाकरेंकडे तर कुणी काँग्रेसकडे जात आहेत. त्यामुळे बुलढाण्याची जनता कुणाचंही आव्हान स्विकारायला तयार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा काहीही संबंंध नाही. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर लोकांची नाराजी होती. त्या नाराजीचा फटका बसल्याने ही मतं पडली आहेत. त्यात आता जमीन अस्मानचा फरक आहे. त्या मतांपैकी आता पाच टक्के मतं देखील शिल्लक राहिलेली नाही.’

Assembly Elections : बाळापूरसह अकोटवरही शिंदे गटाचा दावा!

‘विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात माझा विजय जवळपास सव्वा लाख मतांनी नक्कीच होणार आहे. जो कुणी माझ्या विरोधात निवडणुकीला उभा राहील, त्याचं डिपॉजिट जप्त होईल,’ असा दावा संजय गायकवाड यांनी केला आहे. महायुतीकडून बुलढाणा मतदारसंघातून संजय गायकवाड यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर महाविकास आघाडीत ही जागा ठाकरेंना मिळण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीकडून जालिंदर बुधवत यांच्यासह डॉ. मधुसुदन सावळे, संजय हाडे, सदानंद माळी, हेही इच्छूक आहेत. उच्चशिक्षित आणि बहुजन समाजाचे डॉ. सावळे हेही कामाला लागले आहेत. तर कॉंग्रेसतर्फे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश सचिव जयश्री शेळके, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, या तिघांत चुरस आहे. मीनल आंबेकर यांनीही जिल्हा समितीकडे अर्ज सादर केला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या मतदारसंघातून कोण बाजी मारणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!