देश / विदेश

Budget Sesion : गडकरींच्या कामाची पावती; रस्त्यांसाठी 23 हजार कोटी 

Nirmala Sitharaman : नवे राष्ट्रीय महामार्ग तयार होणार 

Road Development : केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी आतापर्यंत केलेल्या विकासाची पावती त्यांना मिळाली आहे. कोविडसारखी महासाथ असतानाही काम न थांबणाऱ्या गडकरींच्या विभागाला 23 हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात याची घोषणा केली. रस्ते हे देशाच्या आर्थिक विकासाच्या रक्तवाहिन्या असतात. रस्ते जितके मजबूत असतील विकासाला तेवढीच चालना मिळते. त्यामुळे केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील रस्त्यांचे जाळे गेल्या दहा वर्षात बळकट केले.

स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशाच्या अनेक कोपऱ्यांमध्ये रस्ते नव्हते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत नितीन गडकरी यांनी नव्याने मजबूत रस्त्यांचे जाळे विणले. गडकरींच्या विभागांनी केलेल्या अनेक कामांचा विश्वविक्रमही प्रस्थापित झाला आहे. त्यामुळेच मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये रस्त्यांच्या विकासासाठी भरघोस निधी दिला आहे. या निधीतून देशात नवीन रस्ते तयार होतील असा विश्वासही सीतारामण यांनी व्यक्त केला.

नवे मार्ग खुलणार 

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळामध्ये सर्वाधिक काम करणारे मंत्री म्हणून नितीन गडकरी यांची ख्याती आहे. त्यांनी केलेल्या रस्ते बांधणीमुळे अख्या जगाचे लक्ष भारताकडे वळले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारने देशात आणखीन नवीन रस्त्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने तयार होणारे रस्ते कोणते असतील याची वेळोवेळी घोषणा करण्यात येणार आहे. मात्र या रस्त्यांच्या निर्मितीसाठी 23 हजार कोटी रुपयांचा निधी आरक्षित करण्यात आला आहे. अर्थसंकल्पात या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

देशांतर्गत वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वेगवान दळणवळण काळाची गरज झाली आहे. यातूनच काही नव्या राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणही होणार आहे. चौपदरी असलेले महामार्ग भविष्यात आणखी रुंद दिसू शकतात. याशिवाय देशभरात आणखी चौपदरी नवीन महामार्ग तयार होऊ शकतात. ही सर्व कामे सुरळीत व्हावी म्हणून रस्त्यांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला आहे.

नितीन गडकरी यांच्या विभागाने देशभरात केलेली कामे दृश्य स्वरूपातली आहेत. आपल्या कामाच्या जोरावरच गडकरी यांनी लोकसभेच्या (लोक Sabha) निवडणुकीत स्वबळावर विजय खेचून आणला. विरोधकांनी प्रचंड प्रयत्न केल्यानंतरही नागपूर मतदारसंघातून (Nagpur) गडकरी विजयी झालेत. त्यांच्या या सर्व कामाची दखल घेत त्यांना सरकारने एक प्रकारे केलेल्या कार्याची पावतीच दिल्याचे बोलले जात आहे. सरकारकडून मिळालेल्या निधीतून आगामी पाच वर्षात देशातील अनेक रस्त्यांना नवे रूप मिळालेले दिसेल यात शंकाच नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!