Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला. 21 मार्च 2024 रोजी त्यांना ईडीने अटक केली होती.
आज 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. परंतु काही अटी घालून दिलेल्या आहेत. केजरीवाल यांना दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही आणि दिल्ली सचिवालयातही जाऊ शकणार नाही, नायब राज्यपालांच्या परवानगीशिवाय कोणत्याही फाईलवर स्वाक्षरी करायची नाही, मद्य धोरण घोटाळ्यातील स्वतःच्या भूमिकेवर कोणतेही भाष्य करायचे नाही, कोणत्याही साक्षीदारांशी संपर्क साधायचा नाही. ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारुविक्री घोटाळ्या प्रकरणी अटक केली होती. दिल्ली सरकारने 2021-22 मध्ये दारु विक्रीबाबत एक नवीन धोरण आणलं. ज्यामुळे दारुची दुकाने खासगी करण्यात आली आणि सरकारच्या महसुलात वाढ झाली. मात्र, या धोरणामुळे भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक झाली.
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर अकोल्यात संताप
दारूविक्री धोरणाचे परिणाम
दारुविक्री धोरणामुळे छोटे दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आणि मोठ्या दारुविक्रेत्यांना फायदा झाला. विरोधकांचा आरोप आहे की, या धोरणाचा गैरफायदा घेतला गेला आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना लाच देण्यात आली. या घटनेमुळे दिल्लीतील राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला. केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर त्यांना जामीन मंजूर व्हावा म्हणून प्रयत्न झाले. शेवटी आज सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला.