Ajit Pawar : अभूतपूर्व अर्थसंकल्प अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात मांडला. समाजामध्ये जो शोषित वर्ग आहे, त्याला या गोष्टींचीच आवश्यकता होती, असा लोककल्याणकारी निर्णय अजित पवारांनी घेतला आहे. अर्थसंकल्पातून नारीशक्तीला बलवान करण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार ज्या योजना आणल्या त्या योजनांचा लाभ सर्व समाजघटकांना होणार आहे. त्यामुळे ‘एकच वादा अजितदादा’ हे ब्रीदवाक्य वाक्य आहे आणि अजित पवार म्हणजे लाभ आणि बळ’ आहे, असेही सुनिल तटकरे म्हणाले.
चौदाव्या विधानसभेचे शेवटचे अधिवेशन नुकतेच समाप्त झाले. राज्यसरकारने काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. याशिवाय वारकरी, शेतकरी यांच्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.बारामतीमध्ये 13 जुलै जनसमान रॅली आयोजित करण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्राचा पाठिंबा
महिलांच्या खात्यावर जेव्हा रक्कम जमा होईल, त्यावेळी विरोधकांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. या योजनेच्या विरोधात विधिमंडळात त्यांनी भाषण केली. ज्यांनी या योजनेला विरोध केला, तेच आता योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरायला रांगेत उभे आहेत.
एखादी योजना महाराष्ट्रात राबविण्याचा प्रयत्न केला जातो, त्यावेळी त्याचं स्वागत करण्याऐवजी टीका करण्याची भूमिका घेतली जाते. महाराष्ट्रात लोककल्याणासाठी जो काही निर्णय घेतला आहे, त्याला संपूर्ण महाराष्ट्राचा पाठिंबा राहील, अशाप्रकारे लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ते बारामतीत राष्ट्रवादीच्या जन सन्मान रॅलीत बोलत होते.
या ‘जन सन्मान’ जाहीर सभेला राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार सुनेत्रा पवार, क्रीडामंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आदी नेत्यांसह पक्षाचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
नियमित कर्ज फेड करणार्या शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा केले जाणार आहेतच. शिवाय येत्या रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना गिफ्ट द्यावे, अशी विनंती सुनिल तटकरे यांनी यावेळी केली.